जिल्हा दूध संघात झालेल्या लाठीचार्जची सखोल चौकशी करा!

आ.गिरीश महाजन यांची मागणी; चेअरमनसह प्रशासन संवेदनाहिन
जिल्हा दूध संघात झालेल्या लाठीचार्जची सखोल चौकशी करा!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

मुक्ताईनगर येथील झालेल्या विचित्र अपघातात (accident) दूध संघातील कर्मचारी (Staff) धनराज सोनार यांचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. सोनार यांच्या कुटूंबियांना मदत (Help)देण्याऐवजी त्यांच्यावर पोलिसांकडून लाठीचार्ज (lathi charge) करण्यात आला. तसेच मृतदेहाची विटंबनादेखील (Defamation of corpses) करण्यात आली. हा सर्व प्रकार अत्यंत संतापजनक आहे. कुणाच्या इशार्‍यावरुन हा लाठीचार्ज झाला? असा प्रश्न उपस्थित करुन या लाठीचार्ज प्रकरणाची सखोल चौकशी (Investigate) करुन अधिकार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी भाजपाचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन (Former Minister MLA Girish Mahajan) यांनी पत्रकारांशी बोलतांना केली.

भाजपाचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी रविवारी मयत धनराज सोनार यांच्या कुटूंबियांची सांत्वनपर भेट घेतली. या संदर्भात जी.एम.फाऊंडेशन येथे आमदार महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आ. महाजन यांनी सांगितले की, दूध संघाचे कर्मचारी मयत धनराज सोनार यांच्या कुटूंबियांविषयी दूध संघाच्या चेअरमन (Chairman) आणि व्यवस्थापन प्रशासनाने (Management Administration) कुठलीही सहानुभूती दाखविली नाही. अत्यंत संवेदनाहिन अशी माणसे त्या ठिकाणी असल्याचे दिसून आले आहे. साधी अ‍ॅम्बुलन्सदेखील दूध संघाने त्या कुटूंबाला उपलब्ध करुन दिली नाही. मी स्वतः एस.पी. आणि दूध संघाच्या एम.डींशी त्या दिवशी चर्चा केली होती. तरीदेखील सोनार कुटूंबाला कुठल्याही प्रकारची तातडीची आर्थिक मदत (Financial aid) दिली नाही. हे दुर्दैव आहे.

पोलीस प्रशासन दबावाखाली

मयत धनराज सोनार यांच्या कुटूंबाला आर्थिक मदत मिळावी म्हणून, त्यांच्या जवळचे नातेवाईक मृतदेह घेवून दूध संघाच्या प्रवेशव्दाराजवळ आले. त्यांच्या कुटूंबाला मदत करण्याऐवजी मृतदेहाची अवहेलना करुन, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नातेवाईकांसह इतरांवर लाठीचार्ज करण्यात आला. पोलीस प्रशासन (Police administration) दबावाखाली काम करीत असून, कुणाच्या इशार्‍याने हा लाठीचार्ज झाला. याची सखोल चौकशी करावी अशी मागणी आ. महाजन यांनी केली.

एमडीवर गुन्हा दाखल करा

जळगाव दूध संघाचा व वसुंधरा डेअरीचा व्यावसायिक संबंध नसतांना जळगाव दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी दि. 12 मे च्या रात्री भाड्याचा टँकर घेत कर्मचारी धनराज सोनार याला घोडसगावला पाठविले. सकाळी 4.30 वाजता त्याठिकाणी झालेल्या अपघातात धनराज सोनारसह पाचजण ठार झाले. धनराज सोनार यांचा मृतदेह दूध संघात आणल्यानंतर त्याची विटंबना करण्यात आली. त्यामुळे धनराज सोनार यांच्या मृत्यूला जबाबदार असलेले कार्यकारी संचालक मनोज लिमये (Executive Director Manoj Limaye) यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी आ. महाजन यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.

मृतदेहावरुन खडसेंना टोला

यापुर्वीदेखील अनेकांचे मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षकांचे निवासस्थान या ठिकाणी नेण्यात आले आहे. मात्र त्यावेळी कधी लाठीचार्ज झाला का? मग, दूध संघात मृतदेह नेल्यावर लाठीचार्ज कसा झाला? असे सांगत आ. महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.

किमान पाच लाखांची मदत करा

धनराज सोनार यांच्या मृत्युमुळे त्यांचा परिवार पोरका झाला आहे. त्यांच्या पत्नीला कायमस्वरुपी नोकरी आणि किमान पाच लाखांची आर्थिक मदत करावी अशी मागणीही आ. महाजन यांनी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष आ.राजूमामा भोळे, माजी आ. स्मिता वाघ, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com