रोहिणी येथे महिला सरपंचाला शिवीगाळ

चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
रोहिणी येथे महिला सरपंचाला शिवीगाळ

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

तालुक्यातील रोहिणी (Rohini) येथील २२ वर्षीय महिला सरपंचाला (female sarpanch) दोघांंनी जातीवाचक व अश्लील शिवीगाळ (Swearing) केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस (Police) स्थानकात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

रोहिणी येथील महिला सरपंचाला काही कारण नसताना बाळू रघुनाथ नागरे व किरन किसन नागरे (दोघेही रा. रोहिणी ता. चाळीसगाव) या दोघांनी मद्यधुंद होऊन घरासमोर येऊन जातीवाचक व अश्लील शिवीगाळ केली.

याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात भादंवि कलम- २९४, ५०४, ५१०, ३४ व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती कायद्याअंतर्गत वरील दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com