सिंधुताई, इंदिरा गांधी, सरोजिनी नायडू यांच्या कार्यातून मिळाली प्रेरणा

सिंधुताई, इंदिरा गांधी, सरोजिनी नायडू यांच्या कार्यातून मिळाली प्रेरणा

जळगाव jalgaon

सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने (Golden Jubilee Year) नूतन मराठा महाविद्यालयात (Nutan Maratha College) आयोजित कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा (Success stories of capable women) या व्याख्यानमालेच्या (lecture series) सातव्या दिवशी सिंधूताई (Sindhutai) सपकाळ, इंदिरा गांधी (Indira Gandhi) आणि सरोजिनी नायडू (Sarojini Naidu) या तीन कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा सादर करण्यात आली. या कर्तृत्ववान महिलांच्या कार्यातून प्रेरणा (Motivation from work) घेण्याची गरज असल्याचा सुर आजच्या व्याख्यानातून निघाला.

Nutan Martha college logo
Nutan Martha college logo

प्रा. सोनाली राजकुंडल यांनी जिजाऊ वंदना सादर केली.

पहिल्या सत्रात प्रा. कांचन धांडे यांनी चिंधी ते सिंधू असा जीवनपट उभा करताना, मी सिंधूताई सपकाळ बोलतेय असे सांगत मी, गेल्याने माझी पोरं पुन्हा अनाथ होऊ नयेत म्हणून आपण जबाबदारी स्विकारली पाहिजे. असं म्हणतात की माय मरो पण मावशी वाचो! जरी अनाथांची माय सिंधुताई ताई गेली तरी अनाथांची मावशी म्हणून आपल्यातून एखाद्या इंदूताईने पुढे यावं तीच खरी माझ्यासाठी श्रद्धांजली राहील असा आशावाद उपस्थित केला.

या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. माधूरी पाटील होत्या. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सिंधूताई गेल्यानं कधीही भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.नद्यांमध्ये सिंधू संस्कृतीला जसा प्राचीन इतिहास आहे तसाच कर्तबगार महिलांमध्ये, सिंधूताई सपकाळ यांचा गौरवशाली भुतकाळ येणार्‍या अनेक पिढ्यांना दिपस्तंभासारखा मार्ग दाखवत राहील असं सांगून त्यांनी गेल्या आठवड्याभरापासून चालू असलेल्या या कर्तृत्ववान महिलांच्या यशोगाथा सांगणार्‍या व्याख्यानमालेचं कौतुक केले.

दुसर्‍या सत्रात प्रा. स्वाती राजकुंडल यांनी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे बालपण, शिक्षण ते राजकारणातून समाजकारण असा जीवनपट उलगडून त्यांनी केलेली पहिली अणूचाचणी, बँकांचे राष्ट्रीयीकरण अशा विविध धाडसी व देशहितासाठी घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेतला.

या सत्रात डॉ. वाय. पी. पाटील अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्यांनी अध्यक्षीय मनोगतात इंदिरा गांधींच्या अनेक आठवणींना उजाळा देत एक लोकप्रिय पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी भारतीय राजकारणात अमर राहतील असे सांगत संयोजिका डॉ. इंदिरा पाटील तसेच सर्व सहभागी प्राध्यापिकांचे अभिनंदन केले.

तिसर्‍या सत्रात प्रा. पुनम सत्रे यांनी सरोजिनी नायडू यांच्या स्मृतींना उजाळा दिला.सरोजिनी नायडू यांना अनेक भाषा अवगत होत्या, त्यांची कविता अंतर्मुख करणारी होती, त्यांनी अनेक भाषनात स्रि स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, त्या प्रचंड देशाभिमानी आणि स्वातंत्र्य सेनानी होत्या, त्या उत्तम वक्ता, कवयित्री,स्रि चळवळीच्या कार्यकर्त्या, समाज सुधारक, पहिल्या महिला राज्यपाल असा बहूआयामी व्यक्तीमत्व म्हणून भारतीय इतिहासात त्यांनी अमिट असा ठसा उमटविला आहे, त्यांचं व्यक्तीमत्व अनूरकरणीय आणि प्रेरणादायीच आहे असल्याचे प्रा. पुनम सत्रे यांनी सांगितले.

या सत्राचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. एस. ए. गायकवाड होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणात सरोजिनी नायडू यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा थोडक्यात परिचय देत संयोजिका डॉ. इंदिरा पाटील यांच्या या उपक्रमाला जगन्नाथाचा रथ आणि ज्ञानयज्ञ म्हणून गौरव केला.

deshdoot logo
deshdoot logo

सूत्रसंचालन प्रा. भाग्यश्री पाटील यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. भाग्यश्री होले यांनी केले

कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, उपप्राचार्य डॉ. एन. जे. पाटील, उपप्राचार्य प्रा. राजेंद्र देशमुख, उपप्राचार्य प्रा. आर. बी. देशमुख, कार्यक्रमाच्या संयोजिका डॉ. इंदिरा पाटील, सर्व शाखेतील विभाग प्रमुख आणि प्राध्यापक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com