नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई मिळवून देणार- प्रतापराव पाटील

वादळामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी
नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई मिळवून देणार- प्रतापराव पाटील

जळगाव - jalgaon

काल सायंकाळी वादळी वार्‍यांनी (jalgaon taluka) जळगाव तालुक्यातील ग्रामीण भागातल्या शिवाराला तडाखा दिला असून यात मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील करंज, भोकर, भादली, पळसोद, किनोद, कठोरा, नंदगाव, देवगाव, गाढोदा (Karanj, Bhokar, Bhadali, Palsod, Kinod, Kathora, Nandgaon, Devgaon, Gadhoda) आदी गावांमध्ये यामुळे हानी झाली आहे.

या नुकसानीची पाहणी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी आज पहाटेपासूनच थेट शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पहाणी केली. यात त्यांनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई मिळवून देण्याची शेतकर्‍यांना ग्वाही दिली.

तर स्वत: पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी मोबाईलवरून याबाबतची माहिती जाणून घेत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेत. या संदर्भातील माहिती अशी की, काल संध्याकाळी ९ जून रोजी जळगाव तालुक्यातील ग्रामीण भागाला वादळी वार्‍याचा फटका बसला. यात शेतकर्‍यांची मोठी हानी झाली.

विशेष करून या वादळी वार्‍याने कापणीसाठी आलेले केळीचे पीक पार उद्ध्वस्त झाल्याने तालुक्यातील शेतकर्‍यांना मोडा आर्थिक फटका बसला.

दरम्यान, आज होणार्‍या राज्यसभा निवडणुकीसाठी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील हे मतदान करण्यासाठी मुंबईला असल्यामुळे जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी पहाटे सहा वाजेपासूनच नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची थेट बांधावर जाऊन भेट घेऊन आपण पाठीशी असल्याचा धीर दिला. दरम्यान, आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांनी प्रतापभाऊंच्या समोर मोठी हानी झाल्याची व्यथा कथन केली. यावर पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून सर्व नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळावी यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याची ग्वाही प्रतापराव पाटील यांनी याप्रसंगी दिली.

याप्रसंगी प्रतातपराव पाटील यांनी भोकर येथे वृक्ष कोसळून सीताबाई आधार सोनवणे, शांताराम बाविस्कर, शंकर श्रीराम सोनवणे, यांच्यासह चार घरांचे व समाधान महारु सोनवणे यांच्या दुकानाचे नुकसान झाले असून त्यांना भेटून मदतीची ग्वाही दिली.

याप्रसंगी प्रतापराव पाटील यांच्यासोबत शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, उपतालुका प्रमुख प्रमोद सोनवणे, विभाग प्रमुख गजानन विष्णू सोनवणे, उपविभागप्रमुख योगेश लाठी, ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीचे विमा प्रतिनिधी पवार, करंज सरपंच अनिल सोनवणे, किनोद सरपंच प्रवीण पाटील, डॉ.सत्वशील पाटील, डॉ.कमलाकर पाटील, किशोर पाटील, भोकर ग्रकपंचायत सदस्य भोले बाबा, सुनील सोनवणे देवेन्द्र पाटील, संदीप पाटील, भरत हिंमत बोरसे, मुरलीधर पाटील, भोकर सरपंच अरुण सोनवणे, शरद पाटील, महसूल अधिकारी सर्कल दिनेश उगले, तलाठी भरत नन्नवरे, ग्रामसेवक चौधरी, परिसरातील शेतकरी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकासो सदस्य उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com