महापालिका विभागातून चौकशी फाईल गहाळ

jalgaon municipal corporation
jalgaon municipal corporation

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

महापालिकेच्या (Municipal Corporation) आस्थापना विभागातून (Establishment Division) सन 2014 ते 2016 या कालावधीतील विभागीय चौकशीच्या (Departmental Inquiry) अंतीम फाईल्स् (Final files) गहाळ (missing) झाल्याचा प्रकार घडला आहे. या संदर्भात चौकशी समितीने (inquiry committee) ऑन रेकॉर्डवर झालेल्या फाईल गहाळ (case of missing file) प्रकरणी कोणतीही ठोस कारवाई (Any concrete action) केली नसल्याची बाब उघडकीस आली आहे.

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार सन 2020 मध्ये मनपाअंतर्गत भ्रष्टाचार निर्मुलन समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने गेल्या दोन वर्षात एकही बैठक घेतली नसून, दोन वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित आहे. विधी शाखा व नगररचनाकडील 52 लाखांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण, मनपा आस्थापना येथील बोगस वारसाहक्क प्रकरण आदींची चौकशी करण्यासाठी तत्कालीन अप्पर आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी करुन हे प्रकरण अंतीम टप्प्यात आले होते. अंतीम टप्प्यात आलेली फाईल गहाळ झाल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते अनिल नाटेकर यांनी मनपाकडेे विचारल्यानंतर उघडकीस आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com