संजय गांधी निराधार योजनेतील लभार्थ्यांची चौकशी करा

जन आदोलन विभागाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, राजकिय फायद्यासाठी बोगस प्रकरणे
संजय गांधी निराधार योजनेतील लभार्थ्यांची चौकशी करा

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

चाळीसगाव तालुक्यातील अनेक सधन कुुटुंबियांतील लोकांचा संजय गांधी निराधार योजनांमध्ये गेल्या पाच वर्षात तात्कालिन लोकप्रतिनिधींनी तहसिल कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांना हाताशी धरून राजकीय फायद्यासाठी समावेश केला आहे, याची चौकशी करण्यात यावी आशी मागणी येथील जन आदोलन खान्देश विभागातर्फे करण्यात आली आहे. यासंबंधीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना ई-मेलव्दारे पाठविण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, चाळीसगाव तालुक्यातील अनेक सधन कुुटुंबियांतील लोकांचा संजय गांधी निराधार योजनांमध्ये गेल्या पाच वर्षात तात्कालिन लोकप्रतिनिधींनी तहसिल कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांना हाताशी धरून राजकीय फायद्यासाठी समावेश केला आहे.संजय गांधी निराधार योजनेसाठी पात्र होण्यासाठी आवश्यक असलेल्या अटी शर्तीकडे दुर्लक्ष करत, ही प्रकरणे मजूंर करण्यात आली.

तात्कालिन संजय गांधी निराधार योजना समितीतील सदस्यांनी देखील आपल्या मर्जीतील लोकांचा , आर्थीक मलिदा लाटूून घेत ही प्रकरणे मंजूर केली आहे. अशी चर्चा तालुकाभर आहे. चाळीसगावतालुक्यासाठी मंजूर संख्यपेक्षा जास्त लाभार्थी संख्या झाल्याने गेल्या दीड वर्षापासून तालुक्यातील अनेक गरजू व खर्या लाभर्थ्यांना या योजनांचा लाभ मिळत नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

या प्रकरणाची पारदर्शी चौकशी झाल्याशिवाय पात्र लाभर्थ्याना या योजनेचा लाभ मिळणार नाही तरी पाच वर्षात वाढविण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची उच्चस्तरीय समिती मार्फत चौकशी होणे गरजेचे आहे.गेल्या दीड वर्षापासून संजय गांधी निराधार योजना समितीतील सदस्यांची निवड झाली नसल्याने या योजनेच्या लाभापासून गरजवंत नागरिकांना वंचीत राहवे लागत आहे.

तरी पालकमंत्र्यानी संजय गांधी निराधार योजनेसाठी नवीन समिती त्वरित जाहीर करावी, जेणेकरून तहसिल कार्यालयातील अधिकारशाहीमुळे त्रस्त गरीबं नागरिकांना या योजनेचा लाभ मिळेल तसेच तात्काळ जुनी समिती बरखास्त करावी. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनावर जन आंदोलन खान्देश विभागाचेे प्रा.गौतम निकम, डॉ.एस.एम.लंवाडे, वाडिलाल चव्हाण, शत्रुघ्न नेतकर, विजय शर्मा, योगेश्वर राठोड, आबा गुजर, नाशीर शेख, मिलिंद अशोक भालेराव, गणेश भोई, प्रदीप चौधरी, अशोक राठोड, विजय चौधरी, आर.के.पाटील, भावराव गांगुर्डे आदिच्या स्वाक्षर्‍या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com