नवकल्पकता आणि संशोधनवृत्तीला चालना देणारी आविष्कार संशोधन स्पर्धा

  नवकल्पकता आणि संशोधनवृत्तीला चालना देणारी आविष्कार संशोधन स्पर्धा

जळगाव jalgaon प्रतिनिधी

लसुणाच्या अर्कापासून (garlic extract) परिणामकारक किटकनाशक (Pesticides) बनविणे यासारखा विषय असो अथवा वेदनाशामक (Painkillers) औषधांची परिणामकारकता वाढविणे (increase effectiveness,), हर्बल सिगारेटस (Herbal cigarettes) अशा विविध विषयांवरील नवकल्पकता (Innovation) आणि संशोधनवृत्तीला चालना (Research paper) देणारे प्रकल्प विद्यापीठ प्रशाळेतील (University College) विद्यार्थ्यांच्या (students) आविष्कार संशोधन स्पर्धेच्या (Invention Research Competition) निमित्ताने दिसून आले.      

  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रशाळेतील विद्यार्थ्यांची आविष्कार संशोधन स्पर्धा गुरुवार दि. २० ऑक्टोबर रोजी विद्यापीठात झाली. पदवीप्रदान सभागृहात सकाळी कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन झाले यावेळी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, स्पर्धेचे समन्वयक प्रा.एस.आर.कोल्हे, प्रा.व्ही.व्ही.गिते, प्रा.सुनील कुलकर्णी, डॉ.व्ही.एम.रोकडे आदींची उपस्थिती होती.  

      १६९ प्रवेशिकेव्दारे २४४ विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.  विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगून विज्ञान, कृषी, पशुसंवर्धन, वाणिज्य व व्यवस्थापन, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, सामाजिकशास्त्र, फार्मसी आदी विषयांमधील पोस्टर व मोड्युल्सची मांडणी सभागृहात केली होती.  पदवी, पदव्युत्तर, पदव्युत्तर पदवी व‍ शिक्षक या गटातील स्पर्धक मोठया उत्साहाने आपले संशोधन सादर करीत होते. त्यांच्या या संशोधनात नाविन्यता तर होतीच मात्र भविष्यातील संशोधनाची बीजे देखील दिसून येत होती.   

       या स्पर्धेत इकोफ्रेन्डली किटकनाशके, व्हर्टीकल फार्मिंग, प्रदुषणावर उपाय, बॅक्टेरियांचा सुयोग्य वापर, पर्यावरण शिक्षण, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, गुडपार्क इन मायलिंग एरिया, संगणकाचा तंत्रज्ञानात वापर, नैसर्गिक द्रव्यांपासून पॉलिमर रेझिन, सायबर सुरक्षितता, शेतीतील कचऱ्यापासून इंधननिर्मीती, आधुनिक शेती, बायो इथॉनॉल, आधार मतदान कार्डाशी जोडणीची परिणामकारता, आपले सरकार, आत्महत्या, लहान राज्याची मागणी, बेरोजगारी, रशिया युक्रेन युध्द, दारिद्रता, अविकसनशील भारत, मोबाईलचा वापर, लैगिक शिक्षण, महाराष्ट्रातील लोककला, प्लाझ्मा, थर्मल प्रोसेस, सोलर सेल, प्लास्टीक कचऱ्यापासून इंधन निर्मिती, वॉटरबेस पेन्ट, ॲक्रॅलिक पेन्ट, गोमुत्राचे उपयोग आदी विषयांवर पोस्टर व मॉड्युल्स विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आले.  

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com