इनोव्हा कारची बैलगाडीला धडक ; दोन बैल ठार

तळवेल फाट्याजवळील घटना : शेतकरी पती-पत्नी जखमी
इनोव्हा कारची बैलगाडीला धडक ; दोन बैल ठार

वरणगाव फॅक्टरी Varangaon factory । वार्ताहर

येथून जवळच असलेल्या तळवेल फाटयाजवळ इनोव्हा कारची (Innova car) बैलगाडीला (bullock cart) मागून धडक दिल्याने दोघे बैल ठार (Both bulls were killed) झाले तर शेतकरी पती-पत्नी जखमी झाल्याची घटना शनिवार रोजी सकाळी 7 वाजेच्या दरम्यान घडली. जखमींवर जळगाव येथील डॉ.अनिल खडके (Dr. Anil Khadke) यांच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील दर्यापूर येथील रहिवासी सतीष पदमाकर पाटील (वय 53) यांची पत्नी सुरेखा सतिष पाटील (वय 45) यांची शेती तळवेल शिवारातील महामार्गाला लागून आहे. महामार्गावरून बैलगाडी घेवून जात असतांना मागून येणारी इनोव्हा कंपनीची कार क्रमांक एमएच 30 बीबी 7979 वरील चालक नाव गाव माहित नाही.

आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून पुढे चालणार्‍या बैलगाडीला मागून धडक दिल्याने दोघे बैल जागीच ठार झाले तर बैलगाडीवरील पती-पत्नी जखमी झाले असून जळगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. बैलगाडीचे 35 हजार रुपयांचे नुकसान झाले असून मयत झालेले बैलांची अंदाजे किंमत 1 लाख रुपये असल्याचे समजते. इनोव्हा गाडी (Innova car) मोठ्या हस्तीच्या मालकीची असल्याचे समजते. याबाबत वरणगाव पोलिसात कोणत्याच प्रकारची नोंद नाही.

Related Stories

No stories found.