केऱ्हाळे येथे ६४ जणांनी केले रक्तदान

सरदार वल्लभभाई पटेल उत्सव समितीचा उपक्रम
केऱ्हाळे येथे ६४ जणांनी केले रक्तदान

रावेर|प्रतिनिधी raver

तालुक्यातील केऱ्हाळे बु येथे १४ नोव्हेंबर रोजी (Sardar Vallabhbhai Patel) सरदार वल्लभभाई पटेल उत्सव समितीच्यावतीने आयोजित रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न झालें.रक्ताच्या विविध घटकाची मागणी दिवसेंदिवस वाटत असल्याने रक्त तुटवडा भरपूर प्रमाणात आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन गावातील सर्व तरुणांनी मागील वर्षाप्रमाणे रक्तदान शिबीर घेण्याचे ठरवले.

विशेष करून रक्तदात्यांमध्ये तरुण वर्गाने स्वइच्छेने रक्तदान केले.तब्बल ६४ जणांनी रक्तदान करून गाव समोर एक आदर्श उभा केला आहे.येथील सरदार वल्लभभाई पटेल गुर्जर मंगल कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. गावातील सामाजिक कार्यकर्ते,तरुण मंडळी,इत्यादी सक्रीय सहभाग नोंदविला.यावेळी केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेठी यांनी रक्तसंकलन केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com