
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
जिल्ह्याचा तापमानाचा पारा (Temperature mercury) वाढू लागल्याने फळे तसेच भाजीपाला पिकांना याचा मोठा प्रमाणात फटका बसू लागला आहे. भाजीपाला (Temperature mercury) पिके सुकू नये म्हणून शेतकर्यांची ओलिताची कसरत वाढली आहे. तापमान वाढीमुळे भाजीपाल्याची आवक घटली. परिणामी दरवाढही (Price increase) झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अल्पभूधारक बागायतदार उन्हाची पर्वा न करता पीक काढत आहे.
सद्यःस्थितीत कमाल तापमानात वाढ (Temperature mercury) होत असल्याने बाष्पीभवनातही वाढ होत आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादनात घट होत असल्याने बाजार पेठेत कमी आवक होत आहे. त्यामुळे भाज्या दर वधारले आहेत.
उन्हाळी भाजीपाला पिकाला (vegetable crops) पहाटे किंवा सायंकाळच्या वेळी ओलीत केले जात आहे. मात्र ज्या ठिकाणी वीज किंवा पाण्याची समस्या आहे तेथे दुपारी किंवा रात्रीही ओलित केले जात आहे. पाण्याची उपलब्धता (Water availability) आणि बाजारातील मागणी लक्षात घेऊन या काळात उन्हाळी भाजीपाला जसे भेंडी, गवार, चवळी, काकडी, लौकीची लागवड सुरू करावी, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात येत आहे. दरम्यान, कांदा पिकावर फुलकिडे व करपा रोग आढळताच क्विनॉलफॉस 25 टक्के प्रवाही 12 मि.ली + मॅन्कोझेब 25 ग्रॅम + स्क्डोव्हीट स्टीकर 50 मि.ली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
नागरिकांनी काळजी घ्यावी
जिल्ह्यातील तापमान वाढत असून अतिजोखमीच्या गटातील नागरिकांनी आपली काळजी घेणे आवश्यक आहे. यामध्ये उन्हात कष्टाची कामे करणारे, वृद्ध व्यक्ती, लहान बालके, मुले, स्थूल व्यक्ती, पुरेशी झोप न झालेल्या व्यक्ती, गरोदर महिला, अनियंत्रित मधुमेह, हृदयरोग, अपस्मार रुग्ण, दारुचे व्यसन असणारे, काही विशिष्ट औषधी घेत असलेले, बेघर इत्यादी नागरिकांनी काळजी (Citizens care) घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.