इंदोर-अमळनेर बस अपघात ; दहा मृतदेहांची ओळख पटली

अशी आहेत मयतांची नावे
इंदोर-अमळनेर बस अपघात ; दहा मृतदेहांची ओळख पटली

जळगाव - jalgaon

महाराष्ट्र राज्य (State of Maharashtra) मार्ग परिवहन महामंडळाच्या (anakber( अमळनेर आगाराची (Indore-Amalner ST Bus) इंदोर-अमळनेर बस (accident) अपघातात १३ मृतदेह नदीतून काढण्यात आले असून यामध्ये ८ पुरूष, ४ स्त्रिया व एका बालकाचा समावेश आहे.

इंदोर-अमळनेर बस अपघात ; दहा मृतदेहांची ओळख पटली
नर्मदा नदी एस.टी.अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना दहा लाखाची मदत-मुख्यमंत्री
इंदोर-अमळनेर बस अपघात ; दहा मृतदेहांची ओळख पटली
BREAKING NEWS : अपघातग्रस्त एस.टी.बसचे चालक-वाहक अमळनेरचे ; १३ प्रवाशांचा मृत्यू

जिल्हाधिकारी जळगाव व जळगाव जिल्हा प्रशासन हे स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अपघातस्थळी मदत व बचाव कार्य सुरू आहे.

अशी आहेत मयतांची नावे

एसटी महामंडळाकडून प्राप्त माहितीनुसार 1. चेतनचे वडीलराम गोपाल जांगिड़ निवासी नांगल कला गोविंदगढ़ जयपुर राजस्थान, 2. जगन्नाथ यांचे वडील हेमराज जोशी वय 70 वर्ष निवासी मल्हारगढ़ उदयपुर राजस्थान, 3. प्रकाश यांचे वडील श्रवण चौधरी वय 40 वर्षे निवासी शारदा कॉलोनी अमलनेर जलगाव महाराष्ट्र, 4. नीबाजी यांचे वडील आनंदा पाटिल उम्र 60 साल निवासी पीलोदा अमलनेरगां, 5. कमला भाई पति नीबाजी पाटिल वय 55 वर्षे राहणार सी पिलोदा अमलनेर जळगाव, 6.चंद्रकांत यांचे वडील एकनाथ पाटील वय 45 वर्षे राहणार अमलनेर जलगाव यापैकी १ ते ६ पर्यंत मृतांची ओळख आधार कार्ड व्दारे केलेली आहे), 7.श्रीमती अरवा याचे पती मुर्तजा बोरा वय 27 वर्षे निवासी मूर्तिजापुर अकोला महाराष्ट्रातील नातेवाईकांव्दारे ओळख, 8. सैफुद्दीन यांचे वडील अब्बास निवासी नूरानी नगर इंदौर नातेवाईकांव्दारे ओळख पटलेली आहे. ९) चालक -चंद्रकांत एकनाथ पाटील व १०) वाहक-प्रकाश श्रावण चौधरी यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

याशिवाय अद्याप तीन मृतदेहांची ओळख पटणे बाकी आहे. अपघातग्रस्त बस नदीतून बाहेर काढण्यात आली असून. अपघातात अद्याप किती लोक असतील याची माहिती मिळालेली नाही.

अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना एसटीमहामंडळाकडून दहा लाख रूपये मदत देण्यात येते तसेच रूग्णालयात उपचारासाठी दाखल रूग्णांचा उपचारही एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे. सदर अपघातासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने ०२२/२३०२३९४० हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित केली आहे.

घटनास्थळी खरगोन व धारचे जिल्हा प्रशासन पोहोचले असुन बस क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात येत असुन जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येवुन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, त्यांच्या प्रकृतीबाबत अद्ययावत माहिती घेणेचे काम सुरु आहे.

आवश्यक ती सर्व मदत करण्याच्या हेतुने जिल्हाधिकारी जळगाव व जळगाव जिल्हा प्रशासन हे खरगोन व धार जिल्हा प्रशासनाच्या नियमित संपर्कात असून अपघातग्रस्त व्यक्तींना सर्व आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.हेल्पलाईन क्रमांक घटनास्थळी मदतीसाठी 09555899091.,जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष 02572223180, 02572217193 हे क्रमांक जिल्हाधिकारी जळगाव यांनी प्रसिध्द केले आ

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com