चाळीसगावात अपक्षांनी भाजपचा पाठिंबा काढला

नगरपरिषदेत भाजपा अल्पमतात
चाळीसगावात अपक्षांनी भाजपचा पाठिंबा काढला

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

चाळीसगाव नगरपरिषदेत भाजपाच्या, विशेषता; नगराध्यक्षांच्या मर्जीत ठेकेदारांना कामे दिली जातात.

शहारात सुरु असलेल्या अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या कामात, रस्त्यांचे खोदकाम करतांना अनेक ठिकाणी भुभगात ‘ दगड लागलेल्याचे दाखवून’, त्याच्या कामापोटी सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी ठेकेदाराला हाताशी धरुन तब्बल ११ ते १२ कोटी रुपयांचे बिल काढुन, कोट्यावधी रुपयांचे घोळ केल्याचा खळबळजनक आरोप पत्रपरिषदेत उपनगरध्यक्षा आशाबाई रमेश चव्हाण यांच्यातर्फे त्यांचे पती माजी उपनगराध्यक्ष रमेश विक्रम चव्हाण व आरोग्य सभापती तथा नगरसेविका सायली रोशन जाधव यांचे पती रोशन जाधव यांनी केला आहे.

शहरातील अरिहंत मंगल कार्यालयात शहर विकास आघडी व दोन अपक्ष नगरसेविकांच्यातर्फे बुधवारी संकाळी ११.३० वा, संयुक्तरित्या पत्रपरिषदेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपनगराध्यक्षा आशाबाई रमेश चव्हाण, आरोग्य सभापती सायली रोशन जाधव यांच्यासह शहवि आघाडीचे नगरसेवक सुरेश स्वार, अण्णा कोळी, रामचंद्र जाधव, सुर्यकांत ठाकुर, रविंद चौधरी, शेखर देशमुख, नगरसेविका यास्मिनबी फकीरा बेग, सविता राजपूत, अलका गवळी यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण, रोशन जाधव, प्रशांत देशमुख, श्याम देशमुख, भगवान राजपूत आदि मान्यवर उपस्थित होते.

अपक्ष दोन नगरसेविकांनी भाजपाचा पाठींबा काढला-

पुढे माहिती देतांना ते म्हणाले की, चाळीसगाव नगर परिषदेत आम्ही पाठींबा दिल्यामुळे न.पा.त भाजपाची सत्ता स्थापन झाली. गेल्या चार वर्षात आम्ही भाजपाला विकास कामांबाबत पाठींबा दिल्यामुळेच शहरातील विकास कामे झाली आहेत. परंतू गेल्या चार वर्षांपासून नगराध्यक्षाच्या मर्जी ठेकेदारांना कामे दिले जात आहेत. तसेच नगरपरिषदेत सत्ताधार्‍यांकडून दलालीचा प्रकार वाढला आहे. त्यामुळे न.पा.च्या आर्थिक भल्यासाठी आम्ही भाजपा दिलेला पाठींबा काढत आहोत, आणि शहर विकास आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेत आहे. त्यामुळे नगर परिषदेत भाजपा आता अल्पमतात गेली असून भविष्यात नगरपरिषदेवर शहर विकास आघाडीची सत्ता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुढे माहिती देतांना रमेश चव्हाण, रोशन जाधव यांनी सांगीतले की, भुयारी गटार प्रकरण हे न्यायप्रविष्ठबाब असल्यामुळे त्यांच्यावर भाष्य करणे योग्य होणार नाही. परंतू आम्ही मलनिस्साराची निश्‍चिती केलेली जागेबाबत (सर्व्हे नं. ३२९ ) करण्यात आलेल्या ठरावाला लेखी विरोध केला. परंतू आमचे म्हणने ऐकूण घेण्यात आले नाही. तसेच नगराध्यक्षा आशालता चव्हाण या अकार्यक्षम असल्यामुळे आम्ही त्यांना पदावरुन पायउतार करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांना पत्र दिले आहे.

सत्ताधारी पाच ते सहा नगरसेवक आमच्या संपर्कात-

यावेळी शहवि आघाडीचे नगरसेवक व अपक्ष नगरसेवकांनी माहिती देतांना सांगीतले की, सत्ताधारी भाजपाचे पाच ते सहा नगरसेवक हे नगराध्यक्षा कामकाजाला कंटाळुन आमच्या संपर्कात आहे. त्यात जेष्ठ नगरसेवकांचा देखील समावेश आहे. त्यामुळे शासनाच्या नियमाप्रमाणे आम्ही आता नगराध्यक्षावर सभागृहात अविश्‍वासाचा ठराव आनण्यास विचारधीन आहोत. तसेच भुयारी गटारीबाबत येत्या २२ तारखेला निकाल आहे. त्यामुळे त्यावर योग्य तो निर्णय जिल्हाधिकारी देणार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com