भुसावळ रेल्वे विभागात स्वातंत्र्य दिन साजरा

आरपीएफने दिली सलामी : कोरोना योद्ध्यांचा सन्मान
ध्वजाला सलामी देताना
ध्वजाला सलामी देतानाडीआरएम विवेक कुमार गुप्ता

भुसावळ Bhusawal

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात 74 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

डीआरएम कार्यालय - सकाळी ९.३७ वाजता डिअरएम विवेक कुमार गुप्ता यांच्या हस्ते डी आर एम कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजाराेहण करण्यात आले. यावेळी आरपीएफ कर्मचाऱ्यांनी ध्वजाला वंदन करून सलामी दिली आणि मंडळ रेल प्रबंधक यांच्या निरीक्षण खाली आरपीएफ कर्मचाऱ्यांनी परेडला सुरुवात करण्यात आली.

डीआरएम गुप्ता यांनी रेल कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि महाप्रबंधक यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला. प्रसंगी कोरोना योद्धांचा सम्मान करण्यात आला आहे. याप्रसंगी ए डी आर एम मनोज कुमार सिन्हा, वरिष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी एन. डी. गांगुर्डे वरिष्ठ मंडळ परिचालन प्रबंधक आर.के.शर्मा, वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील, वरिष्ठ मंडळ विधुत अभियंता जी.के.लखेरा, वरिष्ठ मंडळ दूरसंचार सिंग्नल अभियंता निशांत द्विवेदी, वरिष्ठ मंडळ अभियंता ( समन्वय ) राजेश चिखले, वरिष्ठ मंडळ सुरक्षा अधिकारी एन. के. अग्रवाल, वरिष्ठ मंडळ विधुत अभियंता ( टीआरओ ) पी के भंज, वरिष्ठ मंडळ विधुत अभियंता (टीआरडी) प्रदीप ओक, मंडळ सुरक्षा आयुक्त क्षितिज गुरव आणि सर्व शाखांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते . यावेळी सोशल डीस्टनसिंग ठेवून व मास्क लावून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला .

वाणिज्य विभाग- दरवर्षी प्रमाणे रेल्वेच्या वाणिज्य विभागा तर्फ 74 वा स्वातंत्र्य दिन पार्सल ऑफिस मधे साजरा करण्यात आला. यावेळी वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले, आणि महाप्रबंधक यांचा संदेश सर्व कर्मचारीना वाचून दाखविण्यात आला . यावेळी मंडल वाणिज्य प्रबंधक बी. अरुण कुमार, सहायक वाणिज्य प्रबंधक(माल ) अनिल बागले, सहायक वाणिज्य प्रबंधक (टी.जा.) अनिल कुमार पाठक , मंडल वाणिज्य निरीक्षक संजय चापोरकर, मुख्य वाणिज्य निरीक्षक जीवन चौधरी, सुदर्शन देशपांडे, आर.डी.क्षीरसागर, शैलेश पारे, प्रकाश ठाकूर, मुख्य पार्सल पर्यवेक्षक हितेंद्र आव्हाड, सर्व वाणिज्य कर्मचारी उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com