जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा वाढला कहर

मुक्ताईनगर, रावेर, वरणगाव,फैजपूरचा पारा 46 अंश; तर जळगाव-भुसावळचा पारा 45 अंशावर नोंद
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा वाढला कहर

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानाचा पारा (Temperature mercury) दिवसागणिक वाढत (Increasing day by day) आहे. उत्तरेकडून वेगाने वाहणार्‍या उष्ण वार्‍यामुळे (Due to hot winds) जिल्ह्यात उष्णतेचा कहर वाढला आहे. मंगळवारी मुक्ताईनगर, रावेर, वरणगाव,फैजपूरचा पारा 46 अंशावर तर जळगाव-भुसावळ,अमळनेर ,धरणगाव, जामनेर, पारोळा, यावल शहराचा पारा 45 अंशावर नोंदविला गेला. एप्रिल महिन्यात हा दुसर्‍यांदा पार्‍याने उच्चांक (High) गाठला आहे. उष्णतेच्या तीव्र लाटांमुळे शहरासह जिल्ह्यात कर्फ्यू सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तीन दिवस उष्णतेची लाट(Heat wave) राहणार असल्याचा जिल्हा प्रशासनाने (District Administration) इशारा दिला होता. मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी 31 मार्चला जिल्ह्याचा पारा 45अंशावर आला होता. त्यानंतर दोन ते तीन दिवस पुन्हा तापमानात चढ-उतार (Fluctuations in temperature) सुरुच होती. त्यानंतर दि. 3 एप्रिलपासून तापमानाचा पारा दिवसागणिक वाढतच गेला होता. दि.9 एप्रिल रोजी जळगाव,भुसावळचा पारा 45.6 अंशावर पोहोचला होता. तर वरणगाव, रावेर, फैजपूर, मुक्ताईनगर शहराचा पारा 46 डिग्री अंशसेल्सिअसवर आला होता.

एप्रिल महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात या शहरात सर्वाधिक तापमान(The highest temperature) असल्याची नोंद झाली होती. त्यानंतर पुन्हा पार्‍यामध्ये चढ-उतार होऊन जिल्ह्यातील तापमान 42 ते 43 अंशावर स्थिरावले होते. मात्र, 11 दिवसानंतर पुन्हा पार्‍याने मुसंडी मारली असून दि. 19 एप्रिल रोजी मुक्ताईनगर, रावेर, वरणगाव,फैजपूरचा पारा 46 अंशावर तर जळगाव-भुसावळ,अमळनेर ,धरणगाव, जामनेर, पारोळा, यावल शहराचा पारा 45 अंशावर नोंदविला गेला. एरंडोल,भडगाव 44 तर चाळीसगाव 40अंशावर नोंद झाली आहे. एप्रिल महिन्यात हा दुसर्‍यांदा पार्‍याने उच्चांक गाठला आहे.

सूर्य जणू सकाळपासूनच आग ओकत असल्याने दुपारच्या सुमारास उन्हाळ्याच्या तीव्र झळामुळे रस्ते निर्मनुष्य (Roads uninhabited) झाल्याचे चित्र होते.मागील वर्षाच्या तुलनेत एप्रिल महिन्याचा तिसरा आठवडा तापदाय ठरत आहे. आज तापमानाच्या पार्‍यात अचानक वाढ झाल्याने दिवसभर शासकीय कार्यालयासह नोकरदार वर्गाला या उष्ण झळांच्या लाटांना सामोरे जावे लागले. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी फिरणार्‍यांची संख्या रोडावली होती.

दि. 19 एप्रिल रोजी दुपारी 1.15 ते 2.50वाजेदरम्यान चाळीसगाव वगळता जिल्ह्याने 45 डिग्रीचा पारा ओलांडला.मात्र, दुपारी 3 ते 4.15 वाजेदरम्यान ढगाळ वातावरण झाल्याने काही ठिकाणी 2 ते 3 अंशावर स्थिरावले होते, असे वेलनेस फाउंडेशनचे अभ्यासक निलेश गोरे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.