तालुका वार्तापत्र : यावल तालुक्यात अवैध कामात वाढ

तालुका वार्तापत्र : यावल तालुक्यात अवैध कामात वाढ

यावल तालुक्यात आरोग्य विभागात (Department of Health) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) कायमस्वरूपी नसल्याने आरोग्य विभाग वार्‍यावर असून तालुक्यात बोगस डॉक्टरांची संख्या वाढत चाललेली आहे तर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड सुरू झालेली असून गावठी हातभट्टीची पन्नी दारू विक्री याचा कायमस्वरूपी बीमोड करण्यासाठी पोलीस प्रशासनाने पावले उचलणे गरजेचे आहे.

यावल तालुक्यामध्ये कोरपावली यावल सांगवी किनगाव सह अनेक ठिकाणी बोगस डॉक्टर आपला गोरस धंदा करीत असून डॉक्टर असोसिएशन तर्फे तालुका वैद्यकीय अधिकारी जिल्हा वैद्यकीय अधिकारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे निवेदन सादर करूनही यावल तालुक्यातील बोगस डॉक्टरांचा बंदोबस्त करण्यात आलेला नाही.

तालुक्यातील जनतेच्या जीवाशी खेळ खेळण्याचा कार्यक्रम या डॉक्टरांकडून होत असून तालुका वैद्यकीय अधिकारी ही जागा प्रभारी मालिका सुरू असून सध्या वार्‍यावरच आहे तालुका वैद्य अधिकारी कायमस्वरूपी देऊन सक्षम असा कार्यभार ठेवण्यात यावा व या बोगस डॉक्टरांचा समाचार घेण्यात यावा, असे निवेदन तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे व जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे डॉक्टर असोसिएशन निवेदन दिलेले होते मात्र त्या निवेदनाला केराची टोपली मिळालेली आहे.

यावल तालुक्यात सातपुड्यापासून तसेच शेत शिवारापर्यंत मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सर्रास होताना दिसते सातपुड्यात तर अनेक ठिकाणी वृक्षाची कत्तल करून जंगल तयार करण्याचा सपाटा सुरू आहे. वन विभागाकडे स्टॉप कमी हे नेहमीचे कारण सांगून बंदोबस्त करण्यास ते असमर्थ ठरत आहेत. तसेच मनवेल डांभुर्णी परिसरात हिरव्या वृक्षांची मोठ्या प्रमाणावर राजरोसपणे कत्तल होताना दिसत आहे.

हातनूर कालव्यात विशेष करून नोकरीला असलेल्या एका इसमाचे आशीर्वादाने हातनूर कालव्याच्या दुतर्फा तसेच परिसरात मशीनच्या सहाय्याने रात्री झाडं कापली जातात व सूर्योदय आधी ते वाहतूक केली जाते. मात्र हतनूर कालव्यातही तीच बोंब कर्मचारी नाही. अधिकारी या ठिकाणी राहत नाही जळगाव वरून कार्यभार पाहिला जातो त्यामुळे अवैध वृक्षतोड करणार्‍यांना चांगलेच भावलेले आहे तर बर्‍हाणपूर अंकलेश्वर रस्त्यावर हिंगोना गावाजवळ दोन चिंचेचे झाड सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीतील कापून नेलेत 14 ते 15 हजार रुपयांची एक झाड मात्र सरकारी व्हॅल्युएशन दोन हजाराची होती असा गोरस धंदा हिंगोणा येथील काही स्वतःला प्रतिष्ठित समजून घेणारे करीत असून त्यांचे मारुड गावाशी अवैध वृक्षतोड करणार्‍यांची संधान साधून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांच्या डोळ्यात धुळ फेक करून ही चिंचेची हिरवीगार डेरदार झाड कापण्यात आल्याची वृत्त आहे.

यावल तालुक्यात गाव तिथे हातभट्टी ची अवैध दारू विक्री होताना दिसत असून कोसगाव, पाडळसे, बामनोद, आमोदा, हिंगोणा, विरोदा, हंबर्डी, सांगवी, डोंगर कठोरा, अट्रावल, अंजाळा, यावल, बोरावल गेट, सुतार वाडा, सातूद, कोळवद, कोरपावली ते दहिगाव रस्ता आडगाव कासारखेडा, साखळी, किनगाव बुद्रुक, नायगाव, विचखेडा, डांभुर्णी अशा मोठ्या गावांमध्ये राजसपणे गावठी हातभट्टीची पन्नी दारू मोटरसायकल द्वारा तापी काठावरून कॅनामधून पोहोच केली जाते हे सर्वश्रुत आहे. या दारूमुळे अनेक तरुणांचे अति दारू सेवनामुळे मरण पावलेले आहेत.

अनेकांच्या विधवा पत्न्यांना संसार कसा करावा? आपल्या लेकरांसाठी उदरनिर्वाह कसा चालवावा? असा प्रश्न पडलेला असून, दारूबंदी विभागाची अधिकारी भुसावळ हे ठराविक तारखेलाच या तालुक्यामध्ये फिरतात. गावठी दारू अवैधरित्या विक्री होते छापे टाकले जातात मात्र एक तासाने त्याच ठिकाणी दारू विक्री होते. ही नेमकी कारवाई कोणत्या कायद्याने आहे? याचा लोकप्रतिनिधीं आणि अधिकार्‍यांनी अभ्यास करावा व तालुक्यात पन्नीच्या दारूमुळे अनेक संसार उध्वस्त होत आहे, त्याला कुठेतरी ब्रेक द्यावा, अशी प्रशासनाकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com