आयुध निर्माणींचे दसर्‍याच्या मुहूर्तावर निगमीकरण

महाप्रबंधक वसंत निमजे यांची माहिती : आज कार्यक्रमांचे आयोजन
आयुध निर्माणींचे दसर्‍याच्या मुहूर्तावर निगमीकरण
भुसावळ येथे आयोग निर्माण येत आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना वसंत निमजे

भुसावळ Bhusawal (प्रतिनिधी) -

देशभरातील २३० वर्षांचा इतिसाह असलेल्या ४१ आयुध निर्माणींचे निगमीकरणाचा (ordnance factory nigmikaran) निर्णय केंद्र सरकारने (Central Government) घेतला आहे. त्यात येथिल आयुध निर्माणीचाही समावेश असून, या ४१ निर्माणींचे ७ नविन प्रकल्पात विभागणी करण्यात आली आहे. हे प्रकल्प आज १५ रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशाला समर्पित केले जाणार आहे. यात भुसावळ फॅक्टरीचा (Bhusawal Factory) यंत्र इंडिया लिमिटेडमध्ये (Yantra India Limited) समावेश करण्यात आल्याची माहिती महाप्रबंधक वसंत निमजे (General Manager Vasant Nimje) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

१४ रोजी येथिल आयुध निर्माणीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेसाठी निर्माणीचे अतिरीक्त महाप्रबंधक निलाद्री विश्‍वास, अप्पर महाप्रबंधक राजीव कुमार, जनसंपर्क अधिकारी पी. देवीचंद, प्रशासकीय अधिकारी तरुण कुमार, कनिष्ठ कार्यप्रबंधक एस. आर. पाटील उपस्थित होते.
यावेळी महाप्रबंधक वसंत निमजे म्हणाले की, देशाला दोन दशकांहून अधिक काळ शक्तिशाली आणि संपन्न बनविण्यासाठी आयुध निर्माणी संगठने देशाच्या संरक्षणात महत्वपुर्ण योगदान दिले आहे. आत्मनिर्भर भारत के अंतर्गत निगमीकरणच्या दृष्टीने विविध आयुध निर्माणींचे १ ऑक्टोबरपासून सार्वजनिक क्षेत्रात सात नविन प्रकल्पांमध्ये रुपांतरीत करण्यात आल्याचे महाव्यस्थापक निमजे यांनी सांगितले.
व्यावसायिक स्पर्धेच्या दृष्टीने लाभ होणार -
भुसावळ आयुध निर्माणी आता यंत्र इंडियात सहभागी झाली आहे. याचे मुख्य कार्यालय आता यंत्र इंडिया लिमिटेड अंबाझरी, नागपूर येथे आहे. निगमीकरणामुळे आता आयुध निर्माणींचा विकास, उत्पादकता आणि नफ्यातील संपत्तीच्या स्वरुपात विकसीत होण्यासाठी वाव मिळेल. व्यावसायिकदृष्ट्या स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी हातभार लागणार आहे.
पिनाकाची कमी खर्चात निर्मिती-
भुसावळ आयुध निर्माणीत रॉकेट लॉंचरसाठी आवश्यक असलेल्या पिनाका पॉडची निर्मिती केली जात असून, अगोदर पुणे, अंबाझरीत याची निर्मिती व्हायची मात्र, त्यांचे उत्पादन मुल्य अधिक होती. तर भुसावळ निर्माणीने अतिशय कमी किंमतीत याची निर्मिती केली. त्यामुळे आता देशात एकमेव भुसावळ आयुध निर्माणीतच पिनाका पॉडची निर्मिती केली जाणार आहे. पीनाका पॉडचा खर्च २२ लाखांपर्यंत आहे. मात्र येथिल फॅक्टरीत ते १४ लाखांत तयार होत आहे. हा खर्च साडे बारा लाखांपर्यंत करण्याचे नियोजन असल्याची माहिती महाप्रबंधक वसंत निमजे यांनी दिली. निर्माणीतून १ ऑक्टोबर रोजी दो पीनाका पॉड रवाना झाले आहे. तर ४ गायडंट पिनाका पॉड याच महिन्यात तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
रेल्वेतही ठेकेदारी - आयुध निर्माणींचे निगमीकरण करण्यात आले असून सार्वजनिकक्षेत्रात या कंपन्या काम करणार आहे. सध्या योथिल आयुध निर्माणींचे उत्पन्न साधारण १०० कोटींचे आहे. आगामी काळात या उद्दीष्टात निश्‍चित वाढ होऊन ते १५० ते २०० कोटींपर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्न निर्माणीकडून करण्यात येणार आहे. निर्माणीने रल्वेत ठेकेदारी सुरु केली आहे. रेल्वेच्या ईलॉस्टमल पॅडच्या निर्मितीच्या ठेक्यासाठी प्रयत्न केला होता. निर्माणी खर्चाच्या दृष्टीने चौथ्या क्रमांकावर होती. अगामी काळात या उत्पादनाचे निर्मिती खर्च कमी करण्यात येणार असल्याचे श्री. निमजे यांनी सांगितले.
२५६ पिनाका पॉडची निर्मिती - येथिल आयुध निर्माणीत आतापर्यंत तब्बल २५६ पॉडची निर्मिती करण्यात आली आहे. या वर्षी १०० पॉडची ऑर्डर आहे. यापैकी २५ टक्के उद्दीष्ट पूर्ण झालेले असल्याची माहिती निमजे यांनी दिली.

Related Stories

No stories found.