खान्देशातील पहिल्या वहीगायन महोत्सवाचे जळगावात उदघाटन

तिन दिवस रंगणार लोककलेचा जागर
खान्देशातील पहिल्या वहीगायन महोत्सवाचे जळगावात उदघाटन

जळगाव jalgaon

खान्देश हा विविध लोक साहित्य (Folk literature) आणि परंपरेनी नटलेला प्रदेश आहे. खान्देशातील वहीगायन,( Wahigayan ) सोंग, कानबाई गिते, गोठ, सोगाड्या पार्टी, भगत भोपे आदि लोककला (Folk art) ह्या परंपरेन चालत आलेल्या व खान्देशातील सण, उत्सव व मौखिक साहित्यातुन निर्माण झालेल्या अस्सल लोककला आहे. खान्देशातील विविध लोककलेच्या जतन व संवर्धना सोबतच ह्या लोककलांची माहिती नव्या पिढीला मिळाली तसेच काळाच्या ओघात नामशेष होणा-या या कलेला नव संजीवन मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय (Directorate of Cultural Affairs) मुंबई यांच्या वतीने खान्देशात प्रथमच या महोत्वाचे (Wahigayan Festival) आयोजन करण्यात आले . शुक्रवारी म.गांधी उद्यानात या वहीगायन महोत्सवाचे उद्घाटन महापौर जयश्री महाजन (Mayor Jayashree Mahajan) यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी जि.प.अध्यक्ष ना.रंजना पाटील,(ZP President Ranjana Patil,) शैलेजा चौधरी, सांस्कृतिक संचालनालयाचे सुदर्शन ढगे, वही गायन महोत्सवाचे समन्वयक विनोद ढगे (Coordinator Vinod Dhage) आदी मान्यवर उपस्थित होते.

दि 4 मार्च ते 6 मार्च दरम्यान नवीन बस स्थानका शेजारील ऍम्पीथिएटर, राष्ट्रपिता महात्मा गांधी उद्यानात या महोत्सवाचे आयोजन रोज सांयकाळी ७ ते १० या वेळेत करण्यात आले आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या(Amrit Mahotsava) निमित्ताने सांस्कृतिक कार्य मंत्री (Minister of Cultural Affairs) ना.अमित विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतुन व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री (Guardian Minister) ना. गुलाबरावजी पाटील यांच्या पुढाकाराने या महोत्सवाचे आयोजन केले आहे.

खान्देशातील लोककलावंताना(Folk art) शासनस्तरावर आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, खान्देशातील पारंपारीक लोककलेच्या सन्मान व्हावा या लोककलेत कार्यरत कार्य करणा-या लोककलावंताचा यथोचित गौरव (Pride) व्हावा या उद्देशाने शासनाच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन केले आहे.

या महोत्सवात खान्देशातील व मराठवाडा भागातील नऊ वहीगायन मंडळे (Vahigayan Mandals) सहभागी होणार आहेत. वहीगायन या लोककलेच्या सादरीकरणाने तिन दिवस हा महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवाचे उदघाटन शुक्रवारी सायंकाळी सात वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com