चाळीसगाव येथे शिवनेरी पार्कचे उद्घाटन

सर्वसामान्यांना हक्काचे घर मिळावे हाच शिवनेरी पार्कचा हेतू - आ. मंगेश चव्हाण
चाळीसगाव येथे शिवनेरी पार्कचे उद्घाटन

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

चाळीसगाव शहरातील मालेगाव रोड (Malegaon Road) परिसरात आमदार मंगेश चव्हाण (MLA Mangesh Chavan) यांच्या संकल्पनेतून तसेच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सबके के लिए आवास अर्थात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत चाळीसगाव तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे हक्काचे मिळावे. यासाठी शिवनेरी पार्क हा भव्य गृहप्रकल्प उभा राहत आहे. या भव्य अश्या गृह प्रकल्पाचे उद्घाटन धुळे येथील स्वामीनारायण मंदिराचे महंत प.पू. कोठारी स्वामी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या व आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते घराची सर्वप्रथम नोंदणी करणार्‍या लाभार्थ्याला घराची चावी देण्यात आली.

यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह माजी आमदार श्रीमती स्मिताताई वाघ, भाजयुमोच्या प्रदेश सचिव सौ.भैरवीताई वाघ पलांडे, जेष्ठ विधिज्ञ धनंजय ठोके, सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व संचालक संजय कुमावत, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, शिवनेरी पार्कचे संचालक राजेंद्र पाटील, तांत्रिक सल्लागार दिनेश क्षीरसागर, गोल्डन इव्हेंट्स नाशिकच्या श्वेता चव्हाण व त्यांची टीम यांच्यासह चाळीसगाव तालुक्यातील विविध स्तरातील नागरिक उपस्थित होते. प.पू.स्वामी कोठारी आनंदजीवन स्वामी यांनी आपल्या आशिर्वादपर मनोगतात आमदार मंगेश चव्हाण यांच्या शिवनेरी पार्क या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. तसेच पार्कच्या बाजूलाच लवकरच भव्य अश्या स्वामीनारायण मंदिरासाठी देखील आमदार मंगेश चव्हाण यांनी एक एकर जागा कुठलाही एक रुपयाचा मोबदला न घेता दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. येत्या ऑक्टोबर मध्ये दिवाळी च्या शुभमंगल पर्वावर भव्य अश्या स्वामीनारायण मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याचे देखील आनंदजीवन स्वामी यांनी जाहीर केले.

सर्वसामान्यांना हक्काचे घर मिळावे हाच शिवनेरी पार्कचा हेतू - आ. मंगेश चव्हाण

डोक्यावर हक्काच्या घराचं कवच असावं ते पण वेगाने विकिसित चाळीसगाव शहरातअसं प्रत्येकाचं स्वप्न असतं. सगळ्यांचं स्वप्न मात्र पूर्ण होत नाही. परिस्थिती नावाचे डोंगर, आर्थिक संकटे वाटेत उभी असतात. स्वतःचं घर नसल्याची वेदना मी अनुभवलीयं. म्हणूनच चाळीसगाव तालुक्यात कुणीही त्या स्वप्नापासून वंचित राहू नये, हाच ध्यास घेऊन या स्वप्नाचा पाठलाग केला. आमदारकीची विजयी माळ गळ्यात पडण्याआधी सर्वसामान्यांना परवडेल अश्या गृह प्रकल्पाचाफ शब्द माझ्या वाढदिवसानिमित्त २३ ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यात दिला होता. आज त्याच स्वप्नपूर्तीचे प्रत्यक्षात शुभारंभ करतांना ऊर अभिमानाने भरून येत आहे. व्यावसायिक नफा तोटा हा दृष्टिकोन मनात न ठेवता केवळ चाळीसगाव तालुक्यातील सर्वसामान्यांना हक्काचे घर मिळावे. यासाठी अतिशय माफक अशा किमतींमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करून दिले आहेत. तरी जास्तीत जास्त चाळीसगाव वासियांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com