Photo पालकमंत्र्यांच्या हस्ते पिंप्राळा रेल्वे गेट उड्डाण पुल कामाचा शुभारंभ

१५ दिवसांत सुरू होणार आसोदा रेल्वे उड्डाणपुलाचे काम
Photo पालकमंत्र्यांच्या हस्ते पिंप्राळा रेल्वे गेट उड्डाण पुल कामाचा शुभारंभ

जळगाव - प्रतिनिधी jalgaon

आपण विकास करतांना ग्रामीण आणि शहरी असा भेद कधीही केला नाही. खरं तर हे दोन्ही भाग एकमेकांवर अवलंबून आहे. यातच आपण (jalgaon) जळगावातील संपर्क कायम राखला असून (Rural) ग्रामीणपेक्षा जळगाव शहरात अधिकाधिक कामे केली करण्याचा प्रयत्न आहेत. शहर आणि ग्रामीण या भागांना कनेक्ट करण्यासाठी रस्ते (Roads) आणि पुलांच्या (Bridge) कामांना गती मिळाल्याचे नमूद केले.

अलीकडेच शेळगाव (Shelgaon) येथील तापी नदीवरील (Tapi river) पुलाचे काम सुरू झाले असून खेडी-भोकरी ते भोकर या पुलाचे काम देखील सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

आपण जळगाव शहरात कायम संपर्क ठेवला असून जळगाव शहराला गतवैभव मिळवून देण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे पालकमंत्र्यांनी नमूद केले. तर या उड्डाण पुलाचे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी त्यांनी सूचना दिल्यात. यातीलच एक महत्वाचा टप्पा (Pimprala Railway Gate) पिंप्राळा रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाच्या (Flyover) माध्यमातून पूर्ण होत असल्याचे प्रतिपादन (Guardian Minister Gulabrao Patil) पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केले.

४६ कोटी रूपयांची तरतूद असणार्‍या पिंप्राळा रेल्वे गेटच्या उड्डाण पुलाच्या कामाचा शुभारंभ जळगाव शहरात विकासाचे नवीन पर्व सुरू झाले असून आज एकाच वेळेस रस्त्यांची ७० कामे सुरू असून हा एक नवीन विक्रम आहे. शिवाजीनगर उड्डाण पूल दोन महिन्यात रहदारीसाठी खुला होणार असून (Asoda Railway Gate) आसोदा रेल्वे गेटच्या पुलाचे काम १५ दिवसांमध्ये सुरू होणार असल्याची घोषणा देखील पालकमंत्र्यांनी केली. तर, जळगावला गतवैभव प्राप्त करून देण्याचे आपले उद्दीष्ट असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

यांची होती उपस्थिती

पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पिंप्राळा रेल्वे गेटवर उभारण्यात येणार्‍या रेल्वे ओव्हरब्रिज अर्थात उड्डाण पुलाचे भूमिपुजन आज पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी (MLA Rajumama Bhole) आमदार राजूमामा भोळे, महापौर जयश्रीताई महाजन (Mayor Jayashree Mahajan), उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महापौर तथा (shivsena) शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर ललीत कोल्हे, माजी महापौर नितीन लढ्ढा, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, नगरसेवक दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे, शुचिता हाडा, लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर, किशोर आगीवाल, नांद्रा सरपंच कैलास पाटील, चुडामण वाघ, दिलीप आगीवाल, एकनाथ सोनवणे, विजय सोनवणे, पितांबर सपकाळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी कंत्राटदार सुरेशभाई शिरोया यांच्यातर्फे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उड्डाण पुलाच्या कामाचे विधीवत पूजन करून कामास प्रारंभ करण्यात आला. प्रास्ताविक रेल्वेचे अधिकारी निशांत जैन यांनी केले.

असा असेल उड्डाण पूल : या रेल्वे उड्डाण पुलास ऑक्टोबर २०१९ मध्ये मंजुरी मिळाली. तर ऑक्टोबर २०२१ मध्ये पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने सार्वजनीक बांधकाम खात्याकडे पाच कोटी रूपयांचा निधी वर्ग करण्यात आला. यानंतर या कामाला खर्‍या अर्थाने गती मिळाली. या पुलाच्या कामासाठी ४६ कोटी रूपयांचा निधी लागणार असून याचे कंत्राट (gujrat) गुजरातमधील मिरर इन्फ्रा कंपनीला (Mirror Infra Company) मिळालेले आहे. या पुलाची लांबी एक किलोमीटर राहणार असून यासाठी २५ पिलर आणि १८ गाळ्यांचा समावेश असेल. या पुलाचे काम अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यात येणार आहे. एका वर्षात या पुलाचे काम पूर्ण होणार आहे.

पालकमंत्र्यांकडून कामांसाठी सहकार्य-आ.राजुमामा भोळे

आमदार राजूमामा भोळे यांनी महारेलच्या अधिकार्‍यांनी हे काम वेळेत पूर्ण होईल याची आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले. नाही तर, शिवाजीनगर उड्डाण पुलाप्रमाणे लोकप्रतिनिधींना याचा त्रास होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. विकासाच्या कामात सर्वांनी राजकीय मतभेद विसरून एकोप्याने काम करण्याची गरज असून पालकमंत्र्यांकडून कामासाठी सहकार्य मिळत असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

सुत्रसंचालन महापालिकेचे राजेंद्र पाटील यांनी केले. तर आभार रेल्वेचे अधिकारी संजय बिराजदार यांनी मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com