भरारी फाऊंडेशनच्या बहिणाबाई महोत्सवाचे थाटात उद्घाटन

ढोलताशांच्या गजरात महोत्सवाला सुरूवात ; लोककलांचा जागर
भरारी फाऊंडेशनच्या बहिणाबाई महोत्सवाचे थाटात उद्घाटन

जळगाव jalgoan । प्रतिनिधी

बचत गटातील (self help groups) महिलांना (women) आर्थिक विकासाच्या (Economic development) दृष्टीने प्रोत्साहन देण्यासाठी भरारी फाउंडेशनतर्फे (Bharari Foundation) आयोजीत बहिणाबाई महोत्सवाचे (Bahinabai Mahotsava) आज सागर पार्क मैदानावर खा. उन्मेश पाटील, आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते बहिणाबाई यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व दीपप्रज्वलन करून थाटात उद्घाटन (inaugurated) करण्यात आले.

भरारी फाउंडेशनतर्फे (Bharari Foundation) आयोजीत बहिणाबाई महोत्सवाचे (Bahinabai Mahotsava) यंदा सातवे वर्ष आहे. उद्घाटन (inaugurated) सोहळ्याप्रसंगी डॉ. पी. आर. चौधरी, भालचंद्र पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी कुशल गांधी, आदर्श कोठारी, किशोर ढाके, सपन झुनझुनवाला, स्वरूप लुंकड, सुनील पाटील बाळासाहेब सुर्यवंशी, डॉ. पी. आर. चौधरी, अमर कुकरेजा, अर्चना जाधव शैला चौधरी, कुमुदिनी नारखेडे जयश्री ढगे यांची उपस्थिती होती. सुत्रसंचलन विनोद ढगे यांनी तर दीपक परदेशी यांनी प्रास्ताविक केले.

सामाजिक संस्था, व्यक्ती व युवा मंडळांना पुरस्कार

केशवस्मृती प्रतिष्ठान, शासकीय परिचारिका प्रशिक्षण विद्यालय, महेश प्रगती मंडळ जळगाव, अग्रवाल नवयुवक मंडळ, भवरलाल अ‍ॅण्ड कांताई फाउंडेशन, निर्मिती फाउंडेशन, दि गार्डियन्स फाउंडेशन, जी. एम फाउंडेशन, जितो संघटना, लेवा पाटीलदार सोशल अ‍ॅण्ड स्पोर्ट्स फाउंडेशन, मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन, अमर शहिद संत कंवरराम ट्रस्ट, आदिवासी तडवी भिल्ल महिला मंडळ, डॉ. विलास भोळे, उज्ज्वला वर्मा, डॉ. अनिता पाटील यांना बहिणाबाई पुरस्कार (Bahinabai Award) देऊन सन्मानित करण्यात आले.

Related Stories

No stories found.