अहिर सुवर्णकार महिला मंडळाचा पदग्रहण सोहळा

अध्यक्षपदी रंजना वानखेडे, उपाध्यक्षपदी संगिता विसपुते तर सचिवपदी राजश्री पगार
अहिर सुवर्णकार महिला मंडळाचा पदग्रहण सोहळा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

अहिर सुवर्णकार महिला मंडळच्या (Ahir Suvarnakar Mahila Mandal) माजी अध्यक्षा वैशाली विसपुते यांच्या अध्यक्षतेखाली सुवर्णकार महिलांचा हळदी कुंकूवाचा (Turmeric Kunkuvacha) कार्यक्रम, नवीन पदाधिकारी व कार्यकारिणी जाहीर (Executive announced) करण्यात आली.

माजी अध्यक्षा वैशाली विसपुते (Former President Vaishali Vispute) यांनी नूतन अध्यक्षा रंजना वानखेडे यांच्याकडे पदभार सोपविला.

गेल्या 35 वर्षांपासून अहिर सुवर्णकार महिला मंडळाने अखंडित समाजकार्य (Social work) करण्याचा वसा कायम ठेवून परंपरेत मनाचा तुरा रोवला गेला आहे.

नूतन कार्यकारिणी

अध्यक्षा- रंजना वानखेडे, उपाध्यक्षा संगीता विसपुते, सचिव राजश्री पगार, कार्याध्यक्ष विजया जगताप, खजिनदार सुवर्णा बागुल, सदस्य प्रमिला बाविस्कर, रुपाली भामरे, मनीषा रणधीर, अनिता सोनार, सविता मोरे, सरिता विसपुते, कांचन विसपुते, लता मोरे, सरिता दुसाने, स्वाती सोनार, आशा अहिरराव आदींचा कार्यकारिणीत समावेश आहे.

यावेळी महिलांसाठी हळदी कुंकवाचा (Turmeric Kunkuvacha) कार्यक्रम देखील झाला. नूतन अध्यक्षा रंजना विजय वानखेडे यांनी महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव जिल्हा जळगाव यांचा प्रकर्षाने नामोल्लेख करीत या संघटनेने आम्हाला आजवर खूप बळ दिले आहे व त्या बळावरच महिला मंडळ निरंतर समाजकार्य करीत आहे.

महिलांचा वैचारिक व आर्थिक स्तर (Economic level) उंचाविण्यासाठी सदैव प्रयत्न करून भक्कम महिलांची अखंड साखळी तयार करीतच राहीन, असे मत वानखेडे यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन राजश्री पगार यांनी तर आभार शुभांगी वानखेडे यांनी मानले.

Related Stories

No stories found.