Photos # ...तर यावलमध्ये हिवाळ्यात जाणवणार कृत्रीम पाणीटंचाई

यावल नगर परिषदेची पाणी सोडण्याची हतनूर कालव्याच्या अधिकाऱ्यांना विनंती
Photos # ...तर यावलमध्ये हिवाळ्यात जाणवणार कृत्रीम पाणीटंचाई

यावल Yaval प्रतिनिधी

हतनूर कालव्यात (Hatnoor Canal) रोटेशन (rotation) नुसार पाणी सोडण्यास (release water) दिरंगाई (delay) होत असल्याने यावल शहरातील पिण्याच्या पाण्याच्या (drinking water) पुरवठ्यावर परिणाम (Effect on supply)झाला असून एवढा पावसाळा होऊनही यावलवासीयांना पाणी टंचाईला (residents Yaval lacked water) हिवाळ्यात तोंड द्यावे लागत आहे याला नेमके पाटबंधारे विभाग (Irrigation Department) का नगरपरिषद (municipal council) जबाबदार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शहराचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अतनूर कालव्याच्या मुख्य चारीवरून होतो त्यासाठी मोठा तलाव करण्यात आलेला आहे या तलावात फक्त दोन दिवस पाणीपुरवठा शहराला पुरेल एवढाच पाणी साठा उपलब्ध आहे.

तलावात पाणी साठा कमी असल्यामुळे नगर परिषदेने तीन दिवसा ऐवजी चार दिवसाआड शहराला पाणीपुरवठा करण्याचे गेल्या पंधरा दिवसापासून नियोजन केलेले आहे. गेल्या पंधरा दिवसापासून हतनूर कालव्यातील अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यासाठी पाणी सोडण्यात यावी अशी विनंती नगर परिषदेने केलेली आहे

मात्र रायपूर थोरगव्हाण रस्त्याजवळ रेल्वेच्या पुुलाला हतनूर कालव्याच्या चारीवर बॅरिकेटिंग चे काम सुरू असल्याचा बहाणा करून गेल्या आठ दिवसापासून हतनूर कालव्यातर्फे उडवा उडवी ची उत्तर देण्यात येत आहे.

प्रत्यक्ष थोरगव्हाण रायपुर रेल्वे पुलाजवळ भेट दिली असता या ठिकाणी फक्त कालव्यात माती टाकून ठेवलेली आहे. या ठिकाणी फक्त दोन मजूर गेल्या काही दिवसापासून बॅरॅकेटिंगचे बांधणीचे काम करत असून नेमक्या दोन मजुरांवर जर हे काम होत असेल तर कालव्यात पाणी कधी येणार व रोटेशन नुसार पाणी न मिळाल्या शेतकऱ्यांनाही हरभरा गहू पेरणीसाठी प्रतीक्षा करावी लागणार का किंवा ज्यांनी हरभरा पेरलेला आहे त्यांना पाणी देण्यासाठी उशीर होणार नाही का?

शेतकरी व यावल नगर परिषद पाणीपट्टी कराची आकारणी झाल्यानंतर तात्काळ पैसा भरत आहेत. मात्र हतनूर कालव्याच्या नियोजन शून्य कारभारावर नागरिकांनीही रोष व्यक्त केलेला आहे यावर नगरपरिषदेला गावात पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासकीय कालखंड लागत असल्यामुळे अधिकाऱ्यांनाच तोंड द्यावे लागत आहे. अधिकारी अधिकाऱ्यांचेच ऐकत नाही हे मात्र सिद्ध झालेले दिसत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com