जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात

जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये
आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात
जैन फूडपार्क येथे योगसाधना शिबीरात सहभागी महिला सहकारी.

जळगाव, jalgaon (प्रतिनिधी)

जैन इरिगेशनच्या (Jain Irrigation) जैन हिल्स, जैन एनर्जी पार्क, जैन फूडपार्क, जैन प्लास्टिक पार्क बांभोरी, जैन टिश्युकल्चर पार्क टाकरखेडा त्याच प्रमाणे अनुभूती निवासी स्कूल, अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन (International Contribution Day) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांकडून त्या त्या लोकेशनवर योग मार्गदर्शकांनी कोरोनाचे नियम पाळत योग अभ्यास (Yoga practice) करून घेतला. योग दिनाचे महत्त्व समजून घेत नियमित योग करून निरामय आरोग्याचा संकल्प जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी केला.

जैन इरिगेशनच्या प्लास्टिक पार्क येथे योगदिवस साजरा करता सहकारी.
जैन इरिगेशनच्या प्लास्टिक पार्क येथे योगदिवस साजरा करता सहकारी.

जैन प्लास्टीक पार्क व टिश्युकल्चर पार्क

ताडासन, तिर्यक ताडासन, कटीचक्रासन आणि दोन प्राणायम हे योग करून प्रत्येक व्यक्ती निरामय जीवन जगू शकतो असा आत्मविश्वास योगसाधक सुभाष जाखेटे यांनी व्यक्त केला. जैन प्लास्टिक पार्क व टाकरखेडा येथे त्यांच्या मार्गदर्शनानुसार आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर बोरसे यांनी केले. प्लास्टिक पार्कचे सुमारे ६०० हून अधिक सहकारी, टिश्युकल्चर पार्क येथील महिला सहकाऱ्यांनी देखील यात हिरीरीने सहभाग घेतला होता.

जैन फूडपार्क येथे योगसाधना करताना महिला सरकारी
जैन फूडपार्क येथे योगसाधना करताना महिला सरकारी

जैन फूड पार्क येथे योगसाधना शिबिर

जैन व्हॅली येथे जैन फूड पार्क, जैन एनर्जी पार्क, जैन अॅग्री पार्क, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या सुमारे १००० सहकाऱ्यांनी जैन व्हॅली येथील मसाला प्रक्रिया प्लांट जवळ योगसाधना केली. योग प्रशिक्षक सौ. ज्योती पटेल यांनी योग प्रशिक्षण दिले. ऑक्सीजनची पातळी वाढविण्यासाठी ताडासन करून घेतले. श्वसन शक्ती वाढविण्यासाठी चंद्र व सूर्य नासिका पित्त, मयूरासन, अर्धमयूरासन, प्राणायम, सुर्यनमस्कार केले. पचनशक्तीसाठी पार्श्वोस्तासन, हात व खांद्यासाठी कुक्कुटासन, शरीर लवचिक होण्यासाठी आंजनेयासन, कंबर व पाठीसाठी भुजंगासन शलभासन, तणाव कमी करण्यासाठी अर्धचक्रासन, त्रिकोणासन, गरूडासन करून घेतले. तत्पूर्वी त्यांनी योगदिनाचे शास्त्रीय व अध्यात्मिक महत्त्व ज्योती पटेल यांनी समजून सांगितले.

जैन टिश्यूकल्चर पार्कच्या वरिष्ठ सहकारी सौ. अनिता यादव यांच्याहस्ते सूतीहार देऊन ज्योती पटेल यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कंपनीचे वरिष्ठ सहकारी डॉ. व्ही. आर. सुब्रम्हण्यम, डॉ. प्रमोद करोले, बालाजी हाके, अरविंद कडू, रोशन शहा, संजय पारख, असलम देशपांडे, उदय महाजन, नितीन चोपडा यांसह इतर सहकाऱ्यांची उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमासाठी मानव संसाधन व कार्मिक विभागाच्या जी. आर. पाटील, एस. बी. ठाकरे, रवि कमोद, आर. डी. पाटील, भिकेश जोशी व इतर सहकारी यांचे सहकार्य लाभले तसेच ज्ञानेश्वर शेंडे यांनी सूत्रसंचालन केले.

अनुभूती निवासी शाळेमध्ये योगसाधना करताना विद्यार्थी व शिक्षक
अनुभूती निवासी शाळेमध्ये योगसाधना करताना विद्यार्थी व शिक्षक

अनुभूती निवासी स्कूल व अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल

अनुभूती इंटरनॅशन निवासी स्कूल येथे इयत्ता 5 वी ते 12 च्या संपूर्ण विद्यार्थ्यांसह शिक्षक शिक्षकतेर कर्मचाऱ्यांनी योगसाधना केली. योगशिक्षीका डॉ. स्नेहल पाटील यांनी विविध योगासने करून घेतली. योग एक जीवनशैली यावर मार्गदर्शनही डॉ. स्नेहल पाटील यांनी केले. अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन यांच्या मार्गदर्शनानुसार योगदिन साजरा करण्यात आला. अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये देखील योग दिवस साजरा झाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com