दोन दिवसात मनपाकडे करापोटी भरल्या दोन हजारांच्या 600 नोटा

दोन दिवसात मनपाकडे करापोटी भरल्या दोन हजारांच्या 600 नोटा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

देशात दोन हजार रुपयांच्या नोटा (Two thousand rupees notes) बंद करण्याचा निर्णय रिझर्व बँकेने (Reserve Bank) घेतला आहे. या नोटा दि.30 सप्टेंबर पर्यंत नोटा चलनात असून या बँकेत देखील जमा करता येणार आहे. परंतु काही सहकारी बँकांसह खासगी संस्थांनी दोन हजारांच्या नोटा स्विकारण्यास नकार देत आहे. परंतु जळगाव महापालिकेकडून (Jalgaon Municipal Corporation)कर भरणापोटी (payment of tax) दोन हजार रुपयांच्या नोटा स्विकारल्या (Notes accepted) जात असल्यामुळे अनेक जणांचा मालमत्ताकर या नोटा देवून भरत आहे.

जळगाव महापालिकेकडून मालमत्ता कर व पाणी पट्टीचा भरणा करतांना दोन हजारांच्या नोटा स्विकारल्या जात असल्यामुळे नागरिकांकडून मनपाचा कर भरणा केला जात आहे. गेल्या दोन दिवसात महानगरपालिकेच्या चारही प्रभाग समिती कार्यालयात तब्बल 600 नोटा दोन हजारांच्या जमा झालेल्या आहेत. तसेच यापुढे देखील कर भरणार्‍या नागरिकांकडून दोन हजारांच्या नोटा स्विकारल्या जाणार आहेत. रिझर्व बँकेने दि.30 सप्टेंबरपर्यंत नोटा स्विकारण्याची मुदत दिली असल्यामुळे रिझर्व बँकेचा पुढील निर्णय येईपर्यंत मनपाकडून दोन हजारांच्या नोटा घेतल्या जाणार आहेत.

31 पर्यंत 10 टक्के सूट

चालू आर्थिक वर्षांची घरपट्टी व पाणी पट्टी दि.31 मे 2023 पर्यंत भरल्यास संबधित मालमत्ताधारकांना 10 टक्के सूट (सवलत) देण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी मालमत्ता व पाणी पट्टीचा कर भरून या सवलत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतिने करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com