राष्ट्रीयस्तरावरील शोधनिबंध वाचन स्पर्धेत डॉ. रुपाली चौधरी प्रथम

राष्ट्रीयस्तरावरील शोधनिबंध वाचन  स्पर्धेत  डॉ. रुपाली चौधरी  प्रथम

जळगाव jalgaon

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या (Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University) भाषा व अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्रातील (School of Language and Studies and Research Center) हिंदी विभागाच्यावतीने आयोजित राष्ट्रीयस्तरावरील शोधनिबंध वाचन (research pape) स्पर्धेत प्रथम पुरस्कार डॉ. रुपाली चौधरी (Dr. Rupali Chaudhary) (डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव) (Dr. Annasaheb GD Bendale Women's College) यांच्या आज़ादी के स्वतंत्रता संग्राम में भारतीय भाषा हिंदी का योगदान या शोधनिबंधास देण्यात आला.

व्दितीय पुरस्कार प्रा.विजय लोहार (मु.जे.महाविद्यालय, जळगाव) यांनी सादर केलेल्या स्वतंत्रता संग्राम में हिंदी भाषा का प्रदेय या शोधनिबंधास तर तृतीय पुरस्कार धीरेन्द्र सिंह रांगड-मेघालय यांच्या स्वतंत्रता संग्राम में उत्तराखंडी कवि धनेश शास्त्री का योगदान यास देण्यात आला.

उत्तेजनार्थ पुरस्कार ताहिरा शेख यांच्या आजादी के स्वतंत्रता संग्राम मे भारतीय भाषाओं का योगदान या शोधनिबंधास देण्यात आला. विजेत्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुरस्कार राशी देण्यात आली.

या स्पर्धेत परीक्षक म्हणून रामानुजन महाविद्यालय, दिल्ली येथील डॉ.आलोक रंजन पाण्डेय, इलाहाबाद विद्यापीठाचे हिंदी विषयाचे प्राध्यापक शिव प्रसाद शुक्ल व पुणे येथील सेवानिवृत्त हिंदी प्राध्यापक डॉ.महेंद्र कुमार ठाकुरदास यांनी कामकाज पाहिले.

शोधनिबंध स्पर्धेत एकूण २४ प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांनी आपले शोधनिबंध सादर केले स्पर्धा संपल्यानंतर तिन्ही परीक्षकांनी शोधनिबंध कसा लिहावा व तो कसा प्रस्तूत करावा या विषयी सहभागी स्पर्धकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

विजेत्या स्पर्धकांचे भाषा अभ्यास प्रशाळेच्या संचालिका प्रा. मुक्ता महाजन, हिंदी विभागाचे विभाग प्रमुख डॉ.सुनील कुलकर्णी यांनी अभिनंदन केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संयोजिका डॉ.प्रिति सोनी, प्रा.मनिषा महाजन प्रा.तुषार सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com