हॉट सिटी त जळगावने नंदुरबारला टाकले मागे

गुरूवारी 45.6 अंश तापमानाची नोंद ; उष्णतेच्या झळांनी बेहाल
हॉट सिटी त जळगावने  नंदुरबारला टाकले मागे

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्ह्यात पाच दिवस उष्णतेच्या लाटा (Heat waves) राहणार असल्याचे अलर्ट आले आहे. त्यामुळे तापमानाचा पारा (Temperature mercury) चांगलाच वाढु लागला आहे. गुरूवारी जळगाव शहराचे तापमान 45.6 अंश (45.6 degrees) नोंदविण्यात आले असून यंदाच्या वर्षातील हे सर्वाधिक तापमान असल्याची माहिती ममुराबाद संशोधन केंद्राकडुन (Mamurabad Research Center) देण्यात आली आहे.

जळगाव शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना आज उष्णतेच्या लाटेचा (Heat waves) चांगलाच अनुभव आला. गुरूवारी सकाळी 9 वाजेपासूनच गरम झळा जाणवत होत्या. दुपारी 12 वाजेनंतर उन्हाचे अक्षरश: चटके जाणवत होते. तसेच उष्णतेच्या झळांनी नागरिक हालबेहाल झाल्याचे चित्र दिसून आले.

सावलीची शोधाशोध

तळपत्या सुर्यामुळे घामाघुम झालेले नागरिक आज सावलीचा शोध (search for shade) घेतांना दिसून आले. मोठ्या आणि डेरेदार वृक्षांखाली नागरिक आसरा घेत होते. महामार्गावर झाडे नसल्याने तिकडुन शहराकडे येणार्‍या दुचाकी धारकांना उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागला.

जळगाव ठरले हॉट सिटी

जिल्ह्यात जळगाव शहराचे गुरूवारी सर्वाधिक तापमान नोंदविण्यात आले. 45 .6 अंश सेल्सीअस इतक्या तापमानाची नोंद ममुराबाद संशोधन केद्रांकडुन (Mamurabad Research Center) कुलाबा वेध शाळेला कळविण्यात आले असल्याची माहिती श्री. बेलदार यांनी दिली. तसेच यंदाच्या वर्षातील हे सर्वाधिक तापमान असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे जळगाव हे सर्वाधिक हॉट सिटी (hot city) ठरले आहे. जिल्ह्यात भुसावळ, जामनेर, मुक्ताईनगर, बोदवड या तालुक्यांचेही तापमान सरासरी 43 ते 45 अंश सेल्सीअस दरम्यान राहिले.

Related Stories

No stories found.