उन्हाच्या झळांत अमळनेरच्या सुयोग महिला मंडळाच्या महिलांनी अनुभवला चैत्रगौरीचा गारवा

उन्हाच्या झळांत अमळनेरच्या सुयोग महिला मंडळाच्या महिलांनी अनुभवला चैत्रगौरीचा गारवा

अमळनेर Amalner प्रतिनिधी -

रणरणत्या उन्हाच्या झळांनी (sun's rays) सारेच हैराण झालेले असतांना अमळनेरच्या सुयोग महिला मंडळाच्या (Suyog Mahila Mandal) महिलांनी मात्र चैत्रगौरीच्या (Chaitragauri) कार्यक्रमाचा गारवा (garva) मनसोक्त अनुभवला.

येथील सुयोग महिला मंडळातर्फे चैत्रगौरी (Chaitragauri) निमित्त शहरात विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम घेण्यामागचे उद्दिष्ट महिलांमध्ये एक चैतन्य, एक प्रेरणा, एक नवीन दिशा हेच होते. यासाठी पुण्याहून सौ. रत्ना नितीन दहिवलकर (सूत्रसंचालिका, निवेदिका ,अभिनेत्री, मॉडेल व एलिना इव्हेंट याच्या संचालिका, पुणे),सौ. सविता शरद नावरकर (पिंपरी चिंचवड ,पुणे. संचालिका माय ड्रीम प्रोजेक्ट अदिरा महिला गृह उद्योग) यांना आमंत्रित करण्यात आले होते.

या कार्यक्रमात सविता नावरकर यांनी महिलांनी (Women) व्यक्तिगत विकास (personal development) घडवून आपल्या अस्तित्वाची ओळख कुटूंब सांभाळून कशी निर्माण करता येईल यावर सखोल मार्गदर्शन केले.सौ रत्ना दहीवलकर यांनी स्त्री अशी मी, कशी मी यावर आपली कला जोपासून आपल्याला कलाक्षेत्रात (field of art) सातत्य ठेवून आपला विकास व स्पर्धा कशी टिकवून ठेवता येईल,

यावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले, व कोणतेही काम व कला कशी सर्वश्रेष्ठ आहे हे सांगून महिलांमध्ये एक नवचैतन्य निर्माण केले. अमळनेर येथील लाडशाखिय वाणी समाजातील (Ladshakhiya Vani Samaj) सुयोग महिला मंडळ यांच्यातर्फे समाजातील महिला वर्ग व कन्या यांच्या करिता प्रेरणादायी व उत्कृष्ट असा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे समाजातील सर्व महिलांनी एकाच रंगाच्या पिवळ्या कलर च्या साड्या परिधान कार्यक्रमाची शोभा वाढवली . निवेदन डॉ.सौ. दिपाली विशाल शेंडे (पारोळा) आपल्या निवेदनातून प्रेक्षकवर्गाला मोहित केले.

सुयोग महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.मंगला ब्राह्मणकार यांनी प्रास्ताविक मांडले.

सदर कार्यक्रमात बहुसंख्य सखींची उपस्थिती होती. विविध कला गुणदर्शन (Art quality) कार्यक्रमातून महिलांनी एक से बढकर एक अशी आपली कला सादर केली. कार्यक्रमाच्या शेवटी सगळ्या महिलांनी खेळ खेळले व संपूर्ण कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद (Heartfelt joy) लुटला.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना (Corona) काळा मुळे थांबलेले कार्यक्रम यावर्षी उत्साहपूर्ण व जल्लोषात झाला हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुयोग महिला मंडळाच्या मंगला मनोहर ब्राह्मणकर, अध्यक्ष शकुंतला सुधाकर येवले, उपाध्यक्ष श्रीमती पुष्पा चंद्रकांत भामरे, सेक्रेटरी ममता स्वप्नील अमृतकर सह सेक्रेटरी , वर्षा मिलिंद कुडे, खजिनदार छाया दिलीप कोठावदे, संयोजक जयश्री योगेश येवले, सहसंयोजक पुष्पा पंढरीनाथ नेरकर, सल्लागार श्रीमती रजनी रघुनाथ येवले, सह सल्लागार उज्वला प्रकाश शिरोडे, सदस्य रेखा राजेंद्र मोराणकर, सरला दिपक तलवारे, सदस्य श्रीमती शारदा सुभाष कोठावदे, सदस्य रेखा अरुण माकडे या सर्व महिला मंडळ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.