शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी जिल्ह्यात 16 कलमी कार्यक्रम

बीडिओ, गटशिक्षणाधिकार्‍यांकडून होणार मॉनिटरींग
शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी जिल्ह्यात
 16 कलमी कार्यक्रम

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या zp माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाकडून जिल्ह्याभरात 16 कलमी कार्यक्रम 16 graft program राबविण्यात येणार आहे. त्यात शैक्षणिक गुणवत्ता विकास Educational quality development कार्यक्रम, आठवडी चाचण्या, प्रशिक्षण आदींसह विविध शैक्षणिक उपक्रम राबवून जिल्ह्याभरात प्रभावीपणे या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सीईओ डॉ.पंकज आशिया CEO Dr. Pankaj Asia यांनी शिक्षण विभागाला दिले आहे.

त्यादृष्टीने जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी,शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शाळा मुख्याध्यापकापर्यंत या आदेशाची अंमलबजावणीच्या सूचना परिपत्रकाद्वारे जारी करण्यात आल्या आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी दिली.

जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत 2 ऑक्टोबरपर्यंत 25 टक्के काम पूर्ण करणे गरजेचे आहे. 14 नोव्हेंबरपर्यंत 50 टक्के काम, तर 26 जानेवारी 75 टक्के काम आणि 1 मेपर्यंत 100 टक्के शाळांमध्ये 16 कलम कार्यक्रमांचा अंतर्भाव करणे अपेक्षित आहे. प्रत्येक तालुक्यातील गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकार्‍यांनी प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या व चौथ्या शुक्रवारी आढावा घेणे अपेक्षित असून त्यांची माहिती प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांनी आढावा घेऊन सीईओंना सादर करावयाची आहे.

इन्फ्रास्ट्रक्चरसह विविध बाबींची होणार तपासणी

डाएट अंतर्गत जिल्ह्यातील शाळांमध्ये संगणक प्रक्रिया, इटरनेट जोडणे, मुली-मुलांचे स्वतंत्र टॉलेट, शाळेला संरक्षण भिंत, किचन गृह, डिजीटल क्लासरुम, रेनवॉटर हॉर्वेटिंग, सुसज्ज इलेक्ट्रीक जोडणी, इन्फ्राटक्चर (नवीन तसेच दुरुस्त वर्गखोल्या), हातधुण्याची स्वतंत्र व्यवस्था, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत आधार संलग्नीत ईलेक्ट्रानिक हजेरी, शाळेला मैदान, क्रीडा साहित्य, शाळेच्या मुख्य गरजा आदी 16 कलमी कार्यक्रम राविण्यात येणार आहे.

सीईओंच्या संकल्पनेतून प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागामार्फत शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता विकास व भौतिक सुविधा राबविण्यासंदर्भात 16 कलमी कार्यक्रम आखला आहे.

भाऊसाहेब अकलाडे, प्राथ. शिक्षणाधिकारी, जि.प.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com