Video शिवरायांच्या बाबतीत वाकड तिकडं बोलणाऱ्याला माफ केल जाणार नाही- ना.गुलाबराव पाटील

जळगाव - jalgaon

माझं मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान करणाऱ्यांना मी सोडणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवरायांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी संताप व्यक्त केला.

भाजपाचे आमदार प्रसाद लाड (MLA Prasad Lad) यांनी कोकण महोत्सवाच्या (Konkan Festival) कार्यक्रमासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी या महोत्सवाची माहिती देताना त्यांनी शिवरायांच्या जन्मस्थळाविषयी चुकीचं विधान केलं. आ.लाड यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षाने आक्रमक पवित्रा घेतलेला असताना आता शिंदे गटानेही रोखठोक इशारा दिलाय.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com