पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ बंडाच्या तिसर्‍या दिवशी शिवसेना रस्त्यावर

पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ 
बंडाच्या तिसर्‍या दिवशी शिवसेना रस्त्यावर

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचे निशाण (Signs of rebellion) फडकविल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना (Chief Minister Uddhav Thackeray) पाठींबा (Support) देण्यासाठी जळगावातील शिवसैनिकांनी (Shiv Sainiks) चक्क उध्दव ठाकरे यांचा फोटो घेत (Taking a photo) शहरातून पदयात्रा काढली. जिल्ह्यातील शिवसेनेचे चारही आमदार या बंडात सहभागी झाल्यानंतर तिसर्‍या दिवशी जळगावचे शिवसैनिक मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले.

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्याच्या राजकारणा नाट्यमय घडामोडी घडत आहेत. काल मुख्यमंत्र्यांनी बंड पुकारलेल्या या आमदारांना भावनिक साद घालत चर्चेसाठी येण्याचे आवाहन केले. शिंदेंनी पुकारलेल्या या बंडात जळगाव जिल्ह्यातील पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आ. चिमणराव पाटील, आ. किशोर पाटील, आ. लता सोनवणे यांच्यासह सहयोगी सदस्य आ. चंद्रकांत पाटील हे देखिल सहभागी झाले. जिल्ह्यातील शिवसेना नेतेच बंडात सहभागी झाल्याने शिवसैनिक अस्वस्थ झाले.

उध्दव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है

शिवसेनेत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे एकाकी पडल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिकांकडून त्यांना मोठा पाठींबा मिळत आहे. जळगाव शहरातही बंडाच्या तिसर्‍या दिवशी शिवसैनिक रस्त्यावर उतरले.

शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची प्रतिमा छातीशी लावत शिवसैनिकांनी कार्यालयापासून पदयात्रा काढली.

या पदयात्रेप्रसंगी ‘उध्दव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशी समर्थनार्थ घोषणाबाजीही करण्यात आली. या पदयात्रेत महापौर जयश्री महाजन, महिला आघाडीच्या शोभा चौधरी, गजानन मालपुरे, प्रशांत सुरळकर, मानसिंग सोनवणे, सरीता कोल्हे, मंगला बारी, नगरसेवक सचिन पाटील, प्रशांत नाईक, ज्योती शिवदे यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com