रावेर तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का !

भाटखेडा  सरपंचपदाच्या विजया नंतर जल्लोष करतांना विजयी उमेदवारांचे समर्थक
भाटखेडा सरपंचपदाच्या विजया नंतर जल्लोष करतांना विजयी उमेदवारांचे समर्थकभाटखेडा सरपंचपदाच्या विजया नंतर जल्लोष करतांना विजयी उमेदवारांचे समर्थक

रावेर Raver|प्रतिनिधी-

येथील २२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत (Gram Panchayat Elections) लागलेला निकाल (result) प्रस्थापितांसाठी धक्कादायक आहे.अनेक ठिकाणी जुन्या मातब्बरांना शह देत,युवकांनी या निवडणुकीत मुसंडी मारली आहे.निवडणुकांचे निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी ()winning candidates गुलाल व अबीर उधळण करत जल्लोष (cheers )साजरा केला.

तालुक्यात २२ ग्रामपंचायतीपैकी सरपंच पदाच्या ४ जागा बिनविरोध,दोन जागा रिक्त व उर्वरित १६ ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज लागला.यात १० ग्रामपंचायतीवर भाजप,कॉंग्रेस ४,राष्ट्रवादी २,शिवसेना शिंदे गट ३ ,प्रहार १ असे वर्चस्व राखले आहे.तर सदस्य पदाच्या १९२ जागांचे निकाल जाहीर करण्यात आले.पुढील प्रमाणे कंसात मते,बिनविरोध उमेदवार असे 

थोरगव्हाण -सरपंचपदाच्या निवडणुकीत रेखा शालिक तायडे विजयी, बेबी सुभाषचंद्र तायडे पराभूत,प्रभाग क्र.१ -सतीश नामदेव ,नम्रता उमेश कोल्हे साधना प्रवीण पाटील ,प्रभाग क्र .२ -धीरज प्रवीण पाटील ,नितीन काशिनाथ चौधरी ,हेमलता रमेश बावस्कर ,प्रभाग क्र .३-सचिन नंदकिशोर चौधरी ,उज्वला यशवंत बावस्कर

प्रभाग क्र .४ -रवींद्र मधुकर चौधरी ,बेबी सुभाषचंद्र तायडे(१७५),आशा सुपडू मोरे (बिनविरोध),

अजंदे - सरपंच दत्तात्रय तुकाराम मांडवकर (१०१७) विजयी,नासिबा सुपडू तडवी (१२४) पराभूत,प्रभाग क्र . १-प्रवीण रूपा बिरपण (२३५),लता दत्तात्रय सूर्यवंशी (३३२),पूनम प्रवीण बिरपण(२७६),प्रभाग क्र .२ - रूपाली अजय पाटील (बिनविरोध) ,दीपक दिगंबर सोनवणे  (बिनविरोध) पांडुरंग शिवदास पाटील (२७३)प्रभाग क्र .३- मीना ईश्वर हिवरे  (बिनविरोध) ,ज्योती निलेश बिरपन  (बिनविरोध) ,जयेश राजू बीरपन  (बिनविरोध) 

जानोरी -सरपंच सुलताना यासीन तडवी (४१५) विजयी,हनिफा इमाम तडवी (२५२) पराभूत,प्रभाग क्र . १- शकीला कुर्बान तडवी  (बिनविरोध) ,जुबेदा तुरेबाज तडवी  (बिनविरोध),बबलू अमीर तडवी. (बिनविरोध) प्रभाग क्र .२ -रज्जाक रमजान तडवी (१००),नजमा कालू तडवी (११२),प्रभाग क्र .३- सायबू मेहबूब तडवी (१९१),शबनम राजू तडवी (बिनविरोध) 

वाघोदा बु. सरपंचपदी अलका बाळू महाजन (२४२३) विजयी,शेख जरीनाबी शेख चांद (१७२४) पराभूत,प्रभाग क्र . १- आनंद युवराज भालेराव (२०१),अमिना सुभान तडवी (३६१),उदय प्रभाकर पाटील  (बिनविरोध) प्रभाग क्र .२ - महेंद्र सुरेश काळे (६३१),प्रमिला युवराज भालेराव (५६९), छायाबाई प्रभाकर पाटील (बिनविरोध),प्रभाग क्र .३- रुबिना विजय तडवी (५३८),सुपडू किशोर वाघ (४४१),प्रभाग क्र .४ -संजय काशिनाथ महाजन (४६६),आशा बाळू काकडे (५८३), नसिमाबी म.वायद  (बिनविरोध) प्रभाग क्र .५ - अजय इम्रान तडवी (१९८),स्मिता लक्ष्मिकान्त चौधरी (२७४),कोमल अजय महाजन (बिनविरोध),प्रभाग क्र. ६ - मलक फिरोजाबी साबीर (३८३),नजमा बी मुनाफ शेख  (बिनविरोध) ,चांद शेख नबी शेख  (बिनविरोध), 

निंभोरासिम -सरपंच अनिल अशोक कोळी ( बिनविरोध),प्रभाग क्र . १-  रत्ना नारायण सवर्णे (२१९),किरण व्यंकट चौधरी (२८३),कविता प्रवीण चौधरी (बिनविरोध),प्रभाग क्र .२ -दिलीप बाबुराव सवर्णे(१०७),शोभाबाई संतोष पाटील  (बिनविरोध),प्रभाग क्र .३- जनार्दन नारायण वरणकर (१२९),उज्वला विकास सवर्णे(१२०), 

अटवाडे - सरपंच - ममता किरण कोळी ( बिनविरोध),येथील ग्रामपंचायातीत सर्व उमेद्वार बिनविरोध निवडून आले आहेत. प्रभाग १ - रामकृष्ण कडू पाटील ,वर्षा विलास पाटील ,कल्पनाबाई भगवान धनगर प्रभाग क्र . २ -  गोकुळ भाऊराव करवले ,पूनम मोहन कोळी ,नितीन आत्माराम धनगर. प्रभाग क्र . ३ -     रेखा किशोर महाजन ,कविता जनार्दन महाजन ,योगेश सतीश महाजन.

 खिरोदा प्र.या. -सरपंच मनीषा मनोज चौधरी (१२६१) विजयी,अर्चना सुजित इंगळे (७६७) पराभूत.प्रभाग क्र . १-किशोर सुधाकर चौधरी (१६०),जयश्री महेंद्र जंगले (२२५),शुभांगी लतेश नेहते (२३४),प्रभाग क्र .२ -अनिल भास्कर वाघ (२५१),शबाना फिरोज तडवी (३०८),नयना तुषार इंगळे (४०१),प्रभाग क्र .३-शे.यासीन पिंजारी (२२२),मैमुना मुस्तुफा तडवी (२०६),प्रभाग क्र .४ - ललितकुमार यशवंत चौधरी (२०५),आरती संतोष भालेराव (४३४),प्रभाग क्र .५ - जुम्मा अकबर तडवी (२८९) राहुल मधुकर चौधरी (२९१),प्रियांका भूपेंद्र चौधरी (३७८), 

कांडवेल -सरपंच - जयाबाई योगेश पाटील (३७२) विजयी, प्रभाग क्र . १- कमल भीमराव ठाकरे (१९९),संगीता सुभाष धनगर  (बिनविरोध),लोकेश राजेंद्र धनगर  (बिनविरोध),प्रभाग क्र .२ -किसन  रामेश्वर सूर्यवंशी (३१५),आशा विठ्ठल कोळी (२९९),भारती विनोद कोळी (२७४),प्रभाग क्र .३-किरण भाऊराव पाटील (२०६),जीवन समाधान पाटील (२०९),नलिनी राजेंद्र पाटील (२०९),

 कोचुर खु. - सरपंच पद रिक्त प्रभाग क्र . १- रेश्मा मिलिंद तायडे (११४ ),लीलाबाई घनश्याम तायडे (१०९),गणेश ज्ञानेश्वर महाजन  (बिनविरोध),प्रभाग क्र .२ - रितेश नरेंद्र पंडित (बिनविरोध)संगीता लक्ष्मन तायडे (१५१),प्रभाग क्र .३-  कविता किशोर पाटील(बिनविरोध) प्रशांत बाबुराव तायडे (१५७),

 बलवाडी -सपंच -वैशाली जितेंद्र महाजन (७२६) विजयी,सुवर्णा नितीन पाटील (६८५) पराभूत प्रभाग क्र . १- कैलास शतराज तायडे (२०६),गंगुबाई दौलत पवार (बिनविरोध), मधुकर नामदेव पाटील(बिनविरोध),प्रभाग क्र .२ -जितेंद्र संतोष महाजन (४१५),शे.साजीदाबी अयास (३३९),आशाबाई अरुण तायडे (बिनविरोध),प्रभाग क्र .३- संजय राजाराम वाघ (बिनविरोध), योगिता सुनील तायडे (बिनविरोध),  संगीता ईश्वर ठाकरे(बिनविरोध), 

सुनोदा - सरपंच - बळीराम सीताराम वानखेडे (६६०) विजयी,प्रभाग क्र . १- पंडित चेंडू तायडे (१७१),चंद्रकला नारायण झाल्टे  (बिनविरोध), उषा दीपक पाटील  (बिनविरोध) प्रभाग क्र .२ -निवृत्ती त्रंबक सपकाळे (१५९),कविता सोपान चौधरी  (बिनविरोध), प्रदीप प्रकाश पाटील (बिनविरोध) प्रभाग क्र .३- वैशाली युवराज सपकाळे (बिनविरोध)संजीव जनार्दन सपकाळे (२५६),मराबाई ईश्वर सपकाळे (३८६),

 कुंभारखेडा -सरपंच भरत माधव बोंडे (७९२),विजयी.मुरलीधर काशिनाथ राणे (४४७) पराभूत,प्रभाग क्र . १- जावेद अकबर तडवी (२२३), दिपाली मनोहर पाटील  (बिनविरोध), भास्कर नारायण बोंडे,  (बिनविरोध) प्रभाग क्र .२ -रुबिना तडवी (२८३),चेतन प्रल्हाद गुप्ता (२७७),रीना प्रल्हाद महाजन (बिनविरोध) प्रभाग क्र .३-  लक्ष्मी मुकेश तायडे (बिनविरोध),बेलदार गणेश समाधान (२७७),प्रभाग क्र . ४ -  वैशाली विलास ताठे (बिनविरोध),काजल सूर्यकांत पाटील   (बिनविरोध),माधव तुकाराम पाटील (३३१),

 सावखेडा बु. . - सरपंच -युवराज भिका कराड (८८४) विजयी प्रभाग क्र . १- भागवत बाबुराव महाजन (३१४),तेहरा लतीफ तडवी (३२९),साधना सुपडू नहाले (बिनविरोध),प्रभाग क्र .२ -अल्लाद्दीन इस्माईल तडवी (२६०).शकील रशीद तडवी (३१७),उषा रमेश पाटील (३०५),प्रभाग क्र .३- नितीन केशव पाचपोळ (३०९),मुमताज रफिक तडवी(३०७) सिंधू कमलाकर नहाले (२८८),

सावखेडा खु. -सरपंच  रवींद्र देविदास बखाल (विजयी) प्रभाग क्र . १-  हनीमा रमजान तडवी (बिनविरोध), तुषार नारायण चौधरी  (बिनविरोध) ,प्रभाग क्र .२ - मीना राजू तडवी (विजयी), सिमाबाई मिलिंद चौधरी  (बिनविरोध),प्रभाग क्र .३- आत्मा रोषण तडवी(विजयी),चेतन राजेंद्र महाजन  (बिनविरोध),

गाते -सरपंच -सारिका गणेश पाटील (६५२) विजयी,प्रीती सचिन वाघ (४६०) पराभूत  प्रभाग क्र . १-सदाशिव झांबरे (३१०),रिता सुनील तायडे (३७८),सुनिता संजय तायडे (२९५),प्रभाग क्र .२ -विलास शांताराम चौधरी (१६७) लता सुभाष भालेराव (२२६),अलका धनराज कोळी (२४१),प्रभाग क्र .३-प्रदीप राहुल बार्हे (१७१),पूनम पंकज पाटील (३१९),उषाबाई सिद्धार्थ खैरे (२८३), 

सिंगत - सरपंचपद रिक्त प्रभाग क्र . १- ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य बिनविरोध झाले . प्रभाग क्र . १-  सपना संतोष इंगळे ,योगिता दीपक पाटील , रत्ना गोपाळ महाजन, प्रभाग क्र .२ - रूपाली भीमराव इंगळे ,योगेश रतीराम चौधरी,प्रभाग क्र .३- प्रमोद लक्ष्मणराव पाटील संगीता संजय इंगळे 

नेहेते -सरपंच -मनीषा उज्वल सावळे (७२६),शोभाबाई समाधान साबळे (२५९), या ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत . प्रभाग क्र . १- समाधान चावदस साबळे ,ताराबाई संतोष पाटील ,ममता धीरज धनके प्रभाग क्र .२ - योगेश ब्रिजलाल साबळे , विकास कैलास तायडे,प्रभाग क्र .३- सुनिता दिलीप साबळे ,सरला चंद्रशेखर कचरे ,विशाल अशोक धनगर 

नांदुरखेडा -सरपंच -जोत्स्ना श्रीराम फेटे (२४४ ) विजयी.सुरेश पुना फेटे (१२५) पराभूत.प्रभाग क्र . १- सुनिता शिवाजी धनगर ( बिनविरोध),कैलास गोंडू पाटील (६६),प्रभाग क्र .२ - कविता मोहन पाटील ( बिनविरोध),प्रभाग क्र .३- आनंद दिनकर भील ( बिनविरोध), प्रतिभा राजेंद्र महाजन,

दोधे -सरपंच - गोपाळ जगन्नाथ महाजन ( बिनविरोध), प्रभाग क्र . १- रविंद्र सुकलाल कोळी ( बिनविरोध),प्रभाग क्र .२ - प्रभाकर भागवत पाटील ( बिनविरोध),प्रभाग क्र .३- निवास गोंडू पाटील ( बिनविरोध),

धुरखेडा -सरपंच - सुनंदा गोपाळ कोळी ( बिनविरोध),सर्व सदस्य बिनविरोध प्रभाग क्र . १- सुनंद शांताराम संपल, रूपाली प्रविण बेलदार, लक्ष्मण पांडूरंग पाटील.प्रभाग क्र .२ - अजय कैलास अटकाळे ,मंगला नरेंद्र पाटील.प्रभाग क्र .३- ललिता लक्ष्मण पाटील ,एकनाथ श्रीपत अटकळे .

भाटखेडा  सरपंचपदाच्या विजया नंतर जल्लोष करतांना विजयी उमेदवारांचे समर्थक
VISUAL STORY :सगळे विचारत आहेत…विचार केला सांगूनच टाकू…गुरुवारपर्यंत काय ते कळ काढा

खिरवड -पूनम गोपाळ कोळी (९३९) विजयी.स्वाती जगदीश कोळी (९१७),पराभूत,प्रभाग क्र . १- पार्वताबाई पद्माकर चौधरी ( बिनविरोध),प्रभाग क्र .२ -प्रकाश बिसन तायडे (४०७ ),शे.जाहेर शे.हैदर (४२९),मुमताज कलीम मण्यार (४१४),प्रभाग क्र.३ प्रदीप सुभाष पाटील (२२५ ),ऐश्वर्या निलेश लासुकर(बिनविरोध),नलिनी जितेंद्र पाटील (बिनविरोध),प्रभाग क्र.४ चौधरी काशिनाथ भिका (२२४),ललिता प्रकाश चौधरी (२५०),मंगला चंद्रभान संन्याशी (बिनविरोध),

भाटखेडा  सरपंच सुनिता गुलाब पाटील (५४५) विजयी,रजिया रशीद तडवी (५३६),प्रभाग क्र.१ कामिनी प्रमोद पाटील (२५०),प्रमोद चिंतामण पाटील (२२०),जयश्री प्रफुल्ल महाजन (बिनविरोध),प्रभाग २ मालती भीमराव ठाकरे (१८१),रशिद सुभान तडवी ( बिनविरोध), काशीनाथ तुकाराम कोळी ( बिनविरोध),प्रभाग क्र .३- राहूल अशोक हिवरे ( बिनविरोध), मीना रफीक तडवी ( बिनविरोध), मंदा विनोद पाचपोळे ( बिनविरोध),

भाटखेडा  सरपंचपदाच्या विजया नंतर जल्लोष करतांना विजयी उमेदवारांचे समर्थक
VISUAL STORY : स्व़. सुशांतसिंहच्या EX- गर्ल फ्रेंड चा हा लुक करेल तुम्हालाही घायाळ

मतमोजणीसाठी तहसीलदार उषाराणी देवगुणे,परीक्षाविधीन तहसीलदार डॉ मयूर कळसे,निवासी नायब तहसीलदार संजय तायडे व २२ ग्रामपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी,तहसील कर्मचारी यांनी बिनचूक निवडणूक प्रक्रिया हाताळली.यावेळी बंदोबस्तासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ विवेक सोनवणे,पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक,पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे,मनोहर जाधव यांच्यासह निंभोरा,सावदा,रावेर येथील पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.       

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com