पाचोर्‍यात संजय सावंत कडाडले, म्हणाले बंडखोर आमदारांपैकी एकही निवडून येणार नाही

पाचोरा शिवसेनेचा कार्यकर्ता मेळाव्यात आव्हान
पाचोर्‍यात संजय सावंत कडाडले,  म्हणाले  बंडखोर आमदारांपैकी एकही निवडून येणार नाही

पाचोरा Pachora ( प्रतिनिधी)-

शिवसेना पक्ष (Shiv Sena Party) हा एक न संपणारा विचार (Ask endlessly) आहे. जे सोडुन गेले ते कावळे आणि जे उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पाठीशी खंबीरपणे (Standing firmly) उभे आहेत ते शिवरायांचे खरे मावळे आहेत. हिम्मत असेल तर सद्यस्थितीत निवडणुका घ्या बंडखोर आमदारांपैकी (Rebel MLAs) एक जरी आमदार निवडून आला तर राजकारण सोडेल (If elected, he will leave politics.). असे मत शिवसेनेचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय सांवत यांनी व्यक्त केले.

जारगाव येथील नाथमंदिरात शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.

या मेळाव्यात जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, पाचोरा विधानसभा संपर्क प्रमुख सुनिल पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अॅड अभय पाटील, माजी. जि. प. सदस्य रावसाहेब पाटील, दिपकसिंग राजपुत, उद्धव मराठे, राजेंद्र साळुंखे, तालुका प्रमुख शरद पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, रमेश बाफना, विधानसभा क्षेत्र प्रमुख अविनाश कुडे, दादाभाऊ चौधरी, उपस्थित होते.

पुढे बोलतांना संजय सावंत यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी बंडखोर आमदारां विरोधात टिका करतांना म्हणाले की, बंडखोरांना अडीच वर्षांनंतरच कसे दिवंगत आनंद दिघे आठवले . सन - १९६६ मध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शिवसेना पक्ष वाढविला. ज्या शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढविलेल्या आमदारांवर मतदारांनी विश्वास ठेवला त्याच आमदारांनी उध्दव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसले. या बंडखोर आमदारांना आगामी काळात मतदार त्यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही.

याप्रसंगी शेतकरी सेनेचे तालुक प्रमुख रमेश बाफना मनोगतातात म्हणाले आ. किशोर पाटील यांना स्व. आर. ओ.पाटील यांचा राजकीय वारसा सांभाळता आला नाही. मात्र सद्यस्थितीत किशोर आप्पा ते विसरले.

यावेळी जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, उपजिल्हाप्रमुख अॅड. अभय पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, जि. प. सदस्य रावसाहेब पाटील, दिपकसिंग राजपुत, अविनाश कुडे, प्रितेश जैन, विलास पाटील, अरुण तांबे, तालुका प्रमुख शरद पाटील यांनी देखील बंडोखोर आमदारा विषयी खडे बोल सुनावले.

मेळाव्यास युवासेना विधानसभा सभा क्षेत्र प्रमुख जितेंद्र पाटील, अनिल सावंत, भैय्या महाजन (नगरदेवळा), आबा देसले (सारोळा), प्रितेश जैन (पिंपळगाव हरेश्र्वर), देविदास पाटील, भगवान पाटील, किरण बडगुजर, पप्पु जाधव, राजधर माळी, भैय्यासाहेब पाटील (लासुरे), भगवान पांडे (वाडी शेवाळे), धनराज पाटील (वरखेडी) अधिकार पाटील (सांगवी) यांचे सह तालुकाभरातील पदाधिकारी, गट प्रमुख, गण प्रमुख, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com