मुक्ताईनगरला शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाचे स्वप्न भंगले

मुक्ताईनगरला शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाचे स्वप्न भंगले

मुक्ताईनगर Muktainagar

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या मुक्ताईनगर (Muktainagar) येथील नगर पंचायतच्या नगराध्यक्षपदी (President of Nagar Panchayat) शिंदे गटाचे (Shinde group's) समर्थक असलेल्या पियुष मोरे (महाजन) यांची निवड होण्यासाठी काही तास उरले असतानाच उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार (directed by the High Court) जिल्हाधिकारी यांनी या प्रक्रियेला स्थगिती (Suspension of proceedings) दिली आहे.यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटातील राज्यातला पहिला नगराध्यक्ष बनवण्याचे (becoming the first President) स्वप्न (dream) भंगले (shattered) आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात मोठे खळबळ उडाली आहे.

मुक्ताईनगरच्या तत्कालीन नगराध्यक्ष नजमा तडवी यांचे जात वैधता प्रमाणपत्र वेळेच्या आत सादर न केल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात आले होते. त्यांच्या जागेवर कोणी महिला उमेदवार नसल्यामुळे एसटी या प्रवर्गातून निवडून आलेले पियुष मोरे महाजन यांची या पदावर वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट झाले होते.

नगराध्यक्षपद निवडीच्या शेवटच्या दिवशी त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे आज फक्त त्यांच्या निवडीची औपचारिकता उरलेली होती. परंतु मुक्ताईनगर येथील नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या अनुसूचित जमातीच्या प्राध्यापिका छाया ठीगळे यांनी न्यायालयात धाव घेतली होती त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी अवघे काही तास उरले असताना उच्च न्यायालयाने या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे.

याबाबत अजून न्यायालयाचे आदेश प्राप्त झाले नसले तरी आदेश प्राप्त होईपर्यंत प्रक्रियेला स्थगिती देण्याचे निर्देश हे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांत अधिकारी यांना दिले आहे, त्यामुळे आज दुपारी बारा वाजता होणारी नगराध्यक्ष निवड प्रक्रिया दुपारचे पाच वाजले तरी सुरू करण्यात आलेली नव्हती.

पियुष मोरे महाजन हे एकनाथ शिंदे भाजप गटाचे राज्यातील पहिले नगराध्यक्ष बनणार असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र न्यायालयाने प्रक्रियेला स्थगिती दिल्यामुळे आता त्यांचे स्वप्न भंग झाले आहे. दरम्यान याप्रकरणी आता स्वतः मोरे हे न्यायालयात दात मागू शकतात, नेमके पुढे काय करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

निवडणुकीला स्थगिती राजकीय दबावापोटी येथील नगराध्यक्ष पदासाठी आज निवड होणार होती परंतु निवडणूक प्रगती करण्यात आली आहे मात्र याबाबत कुठलेच लेखी पत्र आम्हाला देण्यात आले नसल्याने हि स्थगिती राजकीय डबावापोटी आणल्याचा आरोप पियुष मोरे ह्यांनी केला.

पियुष मोरे महाजन

आदेश प्राप्त होईपर्यंत या संदर्भात बोलता येणार नाही दरम्यान या संदर्भात मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधून प्रतिक्रिया विचारले असता या संदर्भातील आदेश प्राप्त झाल्याशिवाय बोलता येणार नाही असे त्यांनी सांगितले.

आमदार चंद्रकांत पाटील

फुटीरवाद्यांना चपराक मुक्ताईनगरची नगराध्यक्षपदासाठीची निवडणूक प्रक्रिया रद्द झाल्याने फुटीरवाद्यांना चांगलीच चपराक या माध्यमातून बसली असल्याची प्रतिक्रिया आमदार एकनाथराव खडसे यांनी दिली आहे.

आमदार एकनाथराव खडसे

मुक्ताईनगरतील वातावरण तापले

मुक्ताईनगर नगरपंचायत नगराध्यक्ष पदा ची निवडणूक प्रक्रिया रद्द झाल्याने आता मुक्ताईनगरआतील वातावरण चांगलेच तापले आहे.

मुक्ताईनगर तालुक्यात तसेच मतदारसंघात दोन आमदार यांच्या समर्थकांमध्ये विळ्या भोपळ्याचे सख्ख्य असल्याने या राजकीय क्षेत्रातील कलाटणीमुळे मुक्ताईनगर शहरासह तालुक्यातील व मतदार संघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com