
पाचोरा Pachora प्रतिनिधी
पाचोरा -भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Pachora-Bhadgaon Agricultural Produce Market Committee) दि.२० रोजी माघारीची प्रक्रिया पार पडली आहे.२३४ नामांकन दाखल होते.विविध गटातून एकूण १६९ जणांनी माघार घेतली आहे. निवडणुकीच्या रिंगणात ६० उमेदवार आहेत. त्यापैकी आमदार किशोर पाटील (MLA Kishore Patil)यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजपचे शेतकरी विकास (Shiv Sena BJP Farmer Development Panel,)पॅनल, माजी आमदार दिलीप वाघ (MLA Dilip Wagh,), यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय काँग्रेस, उबाठा सेनेचे महाविकास (Mahavikas Aghadi Panel of Ubhata Sena) आघाडी पॅनल आणि भाजप (BJP) पुरस्कृत स्वतंत्र गटाच्या पॅनल आणि उर्वरित सहा जण कृउबास च्या आखाड्यात आहे.
माघारी नंतर आमदार किशोर पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत शिवसेना-भारतीय जनता पक्षाचे शेतकरी विकास पॅनेलची घोषणा केली. यावेळी सोसायटी सर्वसाधारण मतदार संघाच्या सात - जागांसाठी गणेश पाटिल, राजेंद्र पाटिल, जयवंत पाटील, नितिन पाटिल, विजय पाटिल, प्रकाश पाटिल, नरेंद्र पाटिल, सोसायटी सर्वसाधारण मतदार संघाच्या महिला राखिव दोन - जागांसाठी पुनम प्रशांत पाटिल, अर्चना संजय पाटिल, सोसायटी इतर मागासवर्ग मतदार संघाच्या जागेसाठी संजय पाटिल, भटक्या विमुक्त जाती जागेसाठी लखिचंद पाटिल,/ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघाच्या दोन- जागांसाठी मोहन पाटिल, सुनिल पाटील, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक जागेसाठी राहुल पाटिल,/ग्रामपंचायत अनुसुचित जाती जमाती जागासाठी प्रकाश तांबे, व्यापारी मतदार संघाच्या दोन जागेसाठी गोविंद मोर, मनोज सिसोदिया तर हमाल मापाडी संघाच्या जागेसाठी युसुफ पटेल निवडणूक लढणारे (१८) उमेदवार , माजी सभापती प्रताप हरी पाटील, रावसाहेब पाटील, भाजपचे सदाशिव पाटील, मधुकर काटे, संजय शांताराम पाटील, नंदू सोमवंशी, माजी संचालक भुरा आप्पा, स्विय साहाय्यक राजेश पाटील, प्रवीण ब्राम्हणे आदीं सह पाचोरा- भडगावचे सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
आमदारांनी संवादात सांगितले की, बाजार समितीच्या निवडणुकीत आमच्या शेतकरी विकास पॅनलचे सर्वच उमेदवार १००% निवडून येणार असून मार्केटची सत्ता आमचीच असेल. विजय मिळवण्यासाठी आमचे सर्व उमेदवार प्रचार करणार आहे. आमच्या पॅनल मध्ये कोणतीही गरबड होणार नाही.
विरोधक शिंदे परिवाराचा समाचार घेतांना आमदारांनी आरोप केले की, मार्केट मध्ये शिवसेनेच्या सत्तेत रावसाहेब पाटील यांच्या सभापती कार्यकाळात शेतकरी, व्यापारी, हमाल मापाडी यांना आवश्यक सोयी सुविधा दिल्या. पाचोरा, समितीत काँक्रीटीकरण, शेतकरी निवारा, माती परीक्षण केंद्र,तोलकाटा, स शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी भव्य गोडाऊन, पत्रीशेड उभारून शेतकरी हिताची कामे केली, भडगाव येथे काँक्रीटीकरण, गोडावून शेड, तर नगरदेवला समितीत जाण्यासाठी पूल बांधला, कजगांव ला व्यापारी संकुल , गोडावून, शेडची कामे, वरखेडीच्या गुरांच्या बाजारात कोणत्याही सुविधा नव्हत्या ती कामे केली. आमच्या पूर्वजांनी उभी केलेल्या बाजार समितीच्या मालमत्ता वाढविल्या. या उलट सतीश शिंदे यांनी सत्तेचा आणि कायद्याचा गैर वापर करून आमचे पाच-सहा संचालक अपात्र करून सत्ता मिळविली.
सत्तेत असतांना त्यांनी वालकम्पाउंड आणि पत्री शेड शिवाय कोणतीच कामे केली नाही.सत्तेचा वापर करून मार्केटच्या १२-१५ कोटीं किमतीची मालमत्ता कवडीमोल भावात पुतण्या अमोल शिंदेच्या घशात घालून त्या जागेंवर टोलेजंग मॉल बांधून करोडो रुपये लुटले , अशीच एक मालमत्ता समितीचे कर्ज फेडण्याच्या नावाखाली ६४ स्क्वेअर फूट जागेची शासकीय किंमत कमी दाखवून हा भूखंड विक्रीचा घाट घातला परंतु मी त्यांचा हा डाव हाणून पाडला असून हा वाद न्यायप्रविष्ठ आहे. ही जागा विकून किंवा कवडीमोल भावात घेऊन हाच पैसे मतदारांना वाटून पुन्हा मार्केटची सत्ता घेण्याचा याचा डाव आहे. निवडणूकित शेतकरी विकास पॅनलच्या सर्व जागा विजयी होणार असून यापुढे मार्केटची एक इंचही जागा कोणालाच विक्री होणार नाही.
समितीचे गतवैभव टिकविण्यासाठी आणि समितीच्या भविष्यातील विकासासाठी मतदार शेतकरी सदस्य, व्यापारी, हमाल मापाडी बांधवांनी शेतकरी पॅनल विजयी करण्याचे आवाहन केले. तसेच उद्धव ठाकरे यांच्या सभेचा आमच्या मतदानावर कोणताच परिणाम होणार नाही असा दावा करून हा आरोप फेटाळून लावला. स्व.तात्यासाहेब माझे पितृतुल्य आणि आदर्श, आहेत दि.२४ एप्रिलला मी आणि आमचे शिवसैनिक त्यांच्या पुतळ्यांना करण्यासाठी जाणार असल्याचे आमदारांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देतांना स्पष्ठ केले.