
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
जळगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या (Jalgaon Agricultural Produce Market Committee) 18 जागांसाठी दि. 28 रोजी निवडणूक प्रक्रिया (Election process) पार पडली असून या निवडणुकीचा निकाल उद्या (Result tomorrow) दि. 30 रोजी जाहीर होणार आहे. जळगाव कृषि उत्पन्न बाजार समितीसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) व राष्ट्रवादीचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर (NCP's former guardian minister Gulabrao Deokar)यांची प्रतिष्ठा पणाला (Reputation at stake) लागली असून बाजार समिती कुणाच्या ताब्यात जाते? याची उत्सुकता तालुकावासियांना लागली आहे.
जळगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठी चुरस होती. बाजार समितीच्या 18 जागांसाठी महाविकास आघाडी आणि भाजपा-शिेंद गट यांच्यात सरळ लढत झाली. या निवडणुकीसाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी गावनिहाय सभा घेऊन ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. तर महाविकास आघाडीचे नेते माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनीही उमेदवारांसाठी मतदारांची चांगलीच मोट बांधली होती. जळगाव कृषि उत्पन्न समितीसाठी 87.53 टक्के मतदान झाले. या मतदानाची मतमोजणी उद्या दि. 30 रोजी सकाळी 8 वाजेपासून होणार आहे.
निकालाची उत्सुकता शिगेला
जळगाव तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कारण जिल्ह्यात सहा बाजार समित्यांचे निकाल मोठे धक्कादायक लागले आहे. त्यामुळे जळगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निकालाविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. महाविकास आघाडी आणि भाजपा-शिंदे गटाकडून विजयाचे दावे केले जात आहे. दरम्यान उद्या होणार्या मतमोजणीकडे तालुकावासियांचे लक्ष लागले आहे.
दोन तासात जाहीर होणार निकाल
जळगाव बाजार समितीसाठी उद्या दि. 30 रोजी सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरूवात होईल. सुरूवातीला मतपत्रिकांची छाननी होईल. त्यानंतर मतमोजणी केली जाईल. दोन तासात निकाल जाहीर होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.