जळगावात राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे पंतप्रधानांच्या प्रतिमेचे औक्षण

जळगावात राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे
पंतप्रधानांच्या प्रतिमेचे औक्षण

जळगाव jalgoan। प्रतिनिधी

शहरातील पक्ष कार्यालयासमोर शुक्रवारी राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे (NCP Yuvati Congress) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना भाऊबजीचे औक्षण (Axis of Bhaubji) करून इंधनदरवाढीचा (fuel price hike) निषेध (Protest against) करण्यात आला.

पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवती काँग्रेस व महानगर यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सर्वसामान्यांचे जगणे सोपे करण्याची गरज असताना केंद्र सरकार मात्र सतत भाववाढ करून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरत आहे,म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला ओवाळून प्रतिकात्मक भाऊबीज साजरी करून मोदीजीनी जनतेला गरजेच्या जीवनावश्यक वस्तू स्वस्त करून समस्त महिला भगिनींना भाऊबीजेची भेट द्यावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, दिव्या भोसले, युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, आरोही नेवे, कोमल पाटील, दीपिका भामरे, स्नेहल शिरसाठ आदी युवती उपस्थित होत्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com