संवेदनशील शनिपेठ पोलीस ठाण्याचा कारभार प्रभारींवर

अपुर्‍या मनुष्य बळामुळे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी करावी लागतेय तारेवरची कसरत
संवेदनशील शनिपेठ पोलीस ठाण्याचा कारभार प्रभारींवर

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

अतिसंवेदनशील (sensitive) म्हणून शनिपेठ पोलीस ठाण्याची (Shanipet Police Station) ओळख आहे. याठिकाणी संमिश्र वस्ती असल्याने सण, उत्सवांच्या काळात पोलिसांची कडक नजर या भागावर असते. सार्वजनिक गणेशोत्सव मिरणवुकीतील (Public Ganeshotsav Procession) सर्वाधिक मंडळ या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. अपुर्‍या मनुष्य बळामुळे (Due to insufficient manpower) या पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या पोलिस चौक्या (Police stations) मात्र बंदच आहे. तसेच या पोलीस ठाण्याचा कारभार प्रभारींवर (charge of administration) आहे.

ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक सण, उत्सवांना सुरुवात होते. या सण उत्सवांमध्ये कायदा व सुव्यस्था सुरळीत ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. जिल्हा पोलीस दलात अपुरे मनुष्य बळावर पोलिस प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्याचा कसोशिने प्रयत्न करीत आहे. शहरात प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक गणोशोत्सव मंडळे आहे. गणेशोत्सवाला अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असून गणेश मंडळांच्या परवानगीसाठी पोलिस प्रशासनाकडून सुरुवात झाली आहे.

यातच जळगावची सार्वजनिक गणेश विजर्सजन मिरवणुक ही नेहमीच आकर्षण ठरली आहे. यात संवेदनशील पोलीस ठाणे असलेले शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत 43 मंडळे आहे. यातील 29 मंडळे हे सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत असून यातील 7 मंडळे हे अती संवदेनशील असून त्यांच्यावर शनिपेठ पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत.

पूर्णवेळ पोलीस निरीक्षक आवश्यक

महिनाभरापुर्वी शनिपेठचे तत्कालीन पोलीस निरीक्षक बळीराम हिरे हे सेवानिवृत्त झाले आहे. तेव्हापासून या पोलीस ठाण्याचा चार्ज प्रभारी म्हणून शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्याकडे आहे. त्यामुळे आगामी काळात साजरा होणार्‍या सण, उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्थाळ अबाधित राहण्यासाठी या पोलीस ठाण्याला पुर्णवेळ पोलीस निरीक्षक देणे गरजेचे आहे.

पोलीस चौकी बंदच

संवेदनशील भाग असलेला शनिपेठ पोलीस ठाण्यांतर्गत अनेक पोलीस चौक्यात आहेत. परंतु मंजूर कर्मचारी संख्येपेक्षा निम्म्या कर्मचार्‍यांवर पोलीस ठाण्याचा कारभार सुरु आहे. त्यामुळे या पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या पोलीस चौक्या मात्र बंदच राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com