सातपुड्यातील चांदणे तलाव भागात शेकडो सागवान वृक्षांची कत्तल...

सातपुड्यातील चांदणे तलाव भागात 
शेकडो सागवान वृक्षांची कत्तल...

धानोरा Dhanora ता.चोपडा - वार्ताहर ..

येथून जवळच असलेल्या सातपुड्यातील (Satpuda) चांदणेतलाव (Chandne Lake) जवळील जंगलात (forest) तिन दिवसांपूर्वी वनजमीन काढण्याच्या हेतूने मोठ्या प्रमाणावर अनमोल अशा सागवान वृक्षांची (teak tree) कत्तल (Slaughter) करण्यात आली आहे.मात्र तरिही वनविभाग (Forest Department) या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष करीत असून कोणावरही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे वनप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे.

खान्देश विभागाला निर्सगाची सातपुडा जंगल रूपी बहुमोल अशी भौगोलिक देणगी लाभली आहे.ब-हापुर पासून तर नंदुरबार पर्यंत पसरलेला हा सातपुडा एकेकाळी अनमोल अशा वृक्ष संपत्ती,प्राणी संपत्ती,खणीज संपत्ती, वनौषधींची,पक्षी अशा त-येने नटलेला होत वृक्षप्रेमींसाठी तो अनमोल ठेवाच होता. मात्र कालांतराने जंगलतस्कांची सातपुडा जंगलावर वक्रदृष्ट पडली.त्याला काही वनविभातीलच निगरगठ्ठ व स्वार्थी अधिकारीनी हातभार लागला.काही राजकीय पोळी शेकणारे लोकही त्यात सहभागी झाले.

जंगलातील वृक्षांची सर्रास कत्तल करून वनजमीन काढण्याची जनू स्पर्धाच सुरु झाली.त्याचे लोन संपूर्ण सातपुड्यात पसरून आज हजारो एकर जंगलातील वृक्षांची कत्तल झाली आहे.हिरवागार सातपुडा बोडका झाला आहे. तर काही ठिकाणी जेमतेम शिल्लक वृक्षांवर ही तस्करांची चालणारी कुऱ्हाड थांबण्याचे नावच घेत नाही त्याचाच भाग म्हणून अडावद परिक्षेत्रातील चांदणी तलाव जवळ कक्ष क्र.१५२ मध्ये स्थानिक नागरिकांनी वाचवून ठेवलेला जंगलातील अनमोल अशा शेकडो सागवान वृक्षांची एकाच वेळी कत्तल करून लाखो रुपयांचे नुकसान केले आहे.

या घटनेनंतर वन विभागाचे सह.वनसंरक्षक पी.व्ही हडपे, अडावद परिक्षेत्र अधिकारी आनंद पाटील व वनपाल रोहीदास घोडे हे आले खरी, मात्र वनअधिकारींची कोणावरही कारवाई करण्याची हिंमत झाली नाही.

ऊलट आमच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणीच वृक्षतोड करणारे करत अधिकारीच्या गाडीवरच चढल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचे समजते. वन अधिकारी येथे पुर्णपणे हतबल झाले.व शेकडो सागवान वृक्षांची कत्तल होऊनही ते काहीही करू शकले नाहीत.त्यांनी पंचनामा करण्याचे सोपस्कार पुर्ण केले खरी मात्र लाखो रुपयांचे नुकसान होऊनही अवघे ५५ हजाराचेच नूकसान दाखवण्याची किमया त्यांनी केली आहे.यामुळे वनप्रेमींकडून तिव्र संताप व्यक्त होत असून.योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे.

कक्ष क्र.१५२ मध्ये वृक्षतोड झाली असून.परराज्यातील लोकांनी हे कृत्य केले आहे.याबाबत पंचनामाही केला आहे.या परिसरात दिवस व रात्र गस्त लावली असून वृक्षतोड करणारे व त्यांना प्रोत्साहन देणारे कोणीही असले तरी त्यांची गय न करता कारवाई केली जाईल.या भागात मी स्वतः लक्ष ठेवून आहे.
पी.व्ही.हडपे.स.वनसंरक्षक चोपडा
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com