चाळीसगावात 'श्री' च्या आरतीचा मान तृतीयपंथीयांना

एकदंत गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम
चाळीसगावात 'श्री' च्या आरतीचा मान तृतीयपंथीयांना

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

गणेशोत्सवानिमित्ताने (Ganeshotsav) राज्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, त्याचप्रमाणे चाळीसगाव येथे आमदार मंगेश चव्हाण (MLA Mangesh Chavan) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित एकदंत गणेश मंडळाने (Ekdant Ganesh Mandal) देखील एका स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले होते. चाळीसगाव शहरातील तृतीयपंथीयांकडून (Tritiyapanthi) यावेळी गणेशाची आरती (Aarti of Ganesha) करण्यात आली.

यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण, शहर पोलीस निरीक्षक के.के.पाटील, एकदंत गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, किशोर रणधीर, माजी नगरसेवक भास्कर पाटील, योगेश खंडेलवाल, राहुल पाटील, कपिल पाटील आदी उपस्थित होते.

याप्रसंगी आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी देशात तृतीयपंथी व्यक्तींच्या कल्याणार्थ राष्ट्रीय पोर्टल तयार केले असून त्या माध्यमातून संपूर्ण देशात तृतीयपंथांचे कल्याण व संरक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या विचाराच्या प्रेरणेतून चाळीसगावच्या एकदंताची महाआरतीचा मान शहरातील तृतीयपंथीयांना देण्यात आला होता.

निसर्गाने जरी त्यांना वेगळेपण दिल असलं तरी देवाजवळ कुणीच वेगळा नसतो हा संदेश या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न होता अस ते म्हणाले. तसेच येणार्‍या काळात तृतीयपंथींयांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न असल्याचेही सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com