चाळीसगावात अखेर नदीपात्राची सफाई सुरु

अतिक्रमण मात्र जैसे थे !
चाळीसगावात अखेर नदीपात्राची सफाई सुरु

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

चाळीसगाव (Municipal administration) नगरपालिका प्रशासनाने झोपेचे सोंग घेतल्यामुळे साफसफाई मोहीम राबविली जात नसल्याने पावसाळयात नदी नाले घाणीमुळे तुंबण्याची शक्यता नाकारता येत होती. परंतू यासंबंधी अनेक संघटनी तक्रारी केल्यानतंर अखेर नगरपरिषदतर्फे (Municipal Council) येथील नदीपात्रातील नालेसफाईची सुरुवात बुधवारपासून करण्यात आली. नालेसफाई मात्र मिशन ५०० कोटी लिटर अभियान टिमच्या अतर्ंगत करण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

शहराला गेल्या वर्षी महापूराचा तडाखा बसला होता, यात लाखो करोडो रूपयांची वित्तहानी झाली होती. अनेकाचे संसार उद्धवस्त झाले होते. तर दोन ते तीन लोकाचेे जीव देखील गेले होते. मागील वर्षी नालेसफाई व अतिक्रमण न काढल्यामुळेच पुराचा मोठा फटका बसल्याची टिका न.पा.वर होत आहे. यंदा एप्रिल महिनासंपला तरी देखील नदीपात्रातील नालेसफाई होत नसल्यामुळे न.पा. प्रशासनावर टिका होत होती.

नदीपात्राची स्वच्छता न झाल्यामुळे अनेक संघटनातर्फे नदीपात्राची स्वच्छता करण्याची मागणी केली होती. त्यामुळे नगरपरिषद व मिशन ५०० कोटी लिटर अभियन टिम यांच्या सयुक्तरित्या बुधवार पासून येथील नदीपात्रता स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले आहे. सुरुवातील नदीपात्रावरील पुलांचे नाल्याची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यानतंर हळुहळु संपूर्ण नदीत्राची स्वच्छता करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. परंतू नदीपात्रातील अतिक्रमण अजुन जयसे थे आहे. न.पा.कडून अतिक्रमण काढण्याबाबत अजुनही कुठल्याही पध्दतीची ठोस भूमिक घेण्यात आलेली नसल्यामुळे समाजीक संघटाकडून टिका होत आहे. बुधवारी नदीपात्रातील स्वच्छता प्रसंगी मिशन ५०० कोटी लिटर अभियानाची टिमसोबत न.पा.चे मुख्याधिकारी श्री.ठोबरे साहेब, श्री धनके साहेब, दिपक देशमुख, प्रेमसिंग राजपूत, भुषण लाटे आदि उपस्थित होते.

Related Stories

No stories found.