33 किलो गांजासह धुळ्यातील दोन्ही जाळ्यात

भुसावळ बाजारपेठ पोलिसांची नाकाबंदी दरम्यान कारवाई
33 किलो गांजासह धुळ्यातील दोन्ही जाळ्यात

भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी

वाहनातून होणारी गांजा तस्करी (Cannabis smuggling) बाजारपेठ पोलिसांनी (POLICE) गस्ती दरम्यान रोखत 33 किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी धुळ्यातील दोघांना अटक (Two arrested in Dhule) करण्यात आली असून त्यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे आरोपींना रेल्वेतून झालेल्या वाहतुकीतून हा गांजा मिळाला असून तो वाहनाद्वारे ते धुळे येथे नेत असताना कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी स्वीप्ट चालक विजय वसंत ठिवरे (वय 46, घर क्रमांक 105, मिरजकर नगर, चाळीसगाव रोड, धुळे) व नंदकिशोर हिरामण गवळी (वय 28, रा.पवन नगर, चाळीसगाव रोड, धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहे. दरम्यान, दि.30 रोजी आरोपींना भुसावळ न्यायालयात न्या.आर.एम.जाधव यांच्या न्यायासनापुढे हजर केले असता 3 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

गस्तीदरम्यान पोलिसांची कारवाई - गुरुवार, दि.30 रोजी मध्यरात्री बाजारपेठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला, हवालदार लतीफ शेख, कॉन्स्टेबल प्रणय पवार हे रेल्वे स्टेशन परीसरात नाकाबंदी करीत असताना मध्यरात्री 2.25 वाजेच्या सुमारास मारोती स्वीप्ट (एमएच 01 बीटी 6682) हिची तपासणी केली असता वाहनातील दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्याने वाहनाची डिक्की उघडली असता त्यात प्लॅस्टीक बॅग उघडल्यानंतर त्यात गांजा आढळल्याने वाहनासह दोघांना ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात आणण्यात आले. या प्रकरणी स्वीप्ट चालक विजय वसंत ठिवरे व नंदकिशोर हिरामण गवळी यांच्यासह सतीश व ज्ञानेश्वर (पूर्ण नाव, गाव माहित नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींच्या ताब्यातून जप्त केलेला गांजा तब्बल 33 किलो असून त्याचे बाजारमूल्य एक लाख 65 हजार आहे. तर तीन मोबाईलसह पाच लाखांची चारचाकी मिळून सहा लाख 74 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक गणेश धुमाळ, सहा.निरीक्षक भोये, सहा.निरीक्षक मंगेश गोंटला, पोलिस शिपाई प्रणय पवार, पोलिस हवालदार लतीफ शेख आदींनी केली. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, नाईक किशोर महाजन करीत आहेत.

आरोपींना 3 पर्यंत पोलिस कोठडी -

अटकेतील आरोपी विजय ठिवरे व नंदकिशोर गवळी यांना भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात न्या.आर.एम.जाधव यांच्या न्यायासनापुढे हजर केले असता 3 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.विजय खडसे यांनी प्रभावी युक्तीवाद केला. तपासाधिकारी पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यावेळी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com