भुसावळ तालुक्यात तीन ग्रामपंचायतीत मविआ तर तीनवर भाजपचा झेंडा

भुसावळ तालुक्यात तीन ग्रामपंचायतीत मविआ तर तीनवर भाजपचा झेंडा

भुसावळ Bhusawal । प्रतिनिधी

मोठा गाजावाजा नसला, सभा बैठका नसल्या तरी गावकीच्या दृष्टीने महत्वाच्या अशा भुसावळ तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींचे (Gram Panchayat Elections) सदस्य व थेट सरपंचांचे निकाल जाहीर (result) झाले. तळवेल ग्रामपंचायत वगळता इतर पाच ग्रामपंचायती या लहान होत्या. दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व सहाचे सहा सरपंचांचे निकाल जाहीर झाले व समर्थकांनी गुलाल उधळून मोठा जल्लोष केला.

भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खु., ओझरखेडा, तळवेल, कन्हाळे खु., कन्हाळे बु. व वेल्हाळे या सहा गावांमध्ये निवडणुका झाल्या. भुसावळ तहसील कार्यालयाच्या गोदामात सकाळी दहा वाजेपासून तहसीलदार दिपक धिवरे (निवडणूक निर्णय अधिकारी) यांच्या नेतृत्वात 25 महसुल कर्मचारी अधिकार्‍यांनी मतमोजणी केली. त्यांना नायब तहसीलदार शोभा घुले, भाऊसाहेब शिरसाट, योगेश मुस्कावाड यांनी सहकार्य केले. दुपारी तीन पर्यंत सर्व निकाल स्पष्ट झाले होते. निवडून आलेले सरपंच पदाचे उमेदवार व त्यांचे गाव व पक्ष पुढील प्रमाणे - ओझरखेडा ग्रा.पं. लोकनियुक्त सरपंचपदी दिलीप सुरवाडे. कन्हाळे खु. ग्रा.पं. लोकनियुक्त सरपंच मोहन पाटील विजयी. मोंढाळा ग्रा.पं. लोकनियुक्त सरपंचपदी रत्ना विलास सुरवाडे विजयी. कन्हाळे बु. ग्रा.पं. लोकनियुक्त सरपंचपदी रजिया मोहम्मद गवळी विजयी. तळवेल ग्रा.पं. लोकनियुक्त सरपंचपदी उल्हास भारसके विजयी तर पिंपळगाव ग्रा.पं.च्या लोकनियुक्त सरपंचपदी लक्ष्मण बळिराम पाटील विजयी हे विजयी झाले आहेत.

तसेच गावनिहाय निवडूण आलेले सदस्य तसेच कंसात मिळालेली मते पुढील प्रमाणे- मोंढाळा - प्रभाग क्र.1 - सुरवाडे जितेंद्र राजू (206 मते), पारधी सचिन पुंडलिक (189). प्रभाग क्र.2- घ्यार पंढरीनाथ संतोष (164), परदेशी रेखा देवचंद (160). प्रभाग क्र.3 - धनगर प्रशांत शिवराम (220), कोळी प्रमिला रमेश (237).

कन्हाळे खुर्द - प्रभाग क्र.1 - चौधरी प्रियंका मिलिंद (84), पाटील सरला केवल (81). प्रभाग क्र.2- इंगळे जगदीश वासुदेव (126). प्रभाग क्र.3 - पवार दीपक गोपाळ (130), आव्हाड सुमन सुदाम (138).

पिंपळगाव खुर्द - प्रभाग क्र.1 - राणे निलेश किसन (157), राणे विष्णू राजेंद्र (108), शिंदे अरुणा गणेश (141). प्रभाग क्र.2 - महाजन अरविंद एकनाथ (246), ज्योती नामदेव (188), सोनवणे अन्नपूर्णा किरण (269). प्रभाग क्र.3- पाटील समाधान रामराव (215), पारधी उर्मिला रामदास (339), पाटील कल्पना राजेंद्र (234).

कन्हाळे बु. - प्रभाग क्र.1 - पाटील राजेंद्र रामभाऊ (317), महाजन सोनाली शरद (298), मेरे दुर्गा राजेंद्र (273). प्रभाग क्र.2 - चौधरी मनोहर तुळशीराम (123), गीताबाई रायसिंग पाटील (87). प्रभाग क्र.3 - गवळी मोहम्मद नातू (429).

ओझरखेडा - प्रभाग क्र.1 - सुरवाडे मायाबाई उत्तम (265), नेमाडे भारती पंकज (226). प्रभाग क्र.2 - झांबरे ज्ञानदेव मुरलीधर (203), नेमाडे पल्लवी प्रफुल्ल (160), पाटील सावित्री सोपान (162). प्रभाग क्र.3 - पाटील अतुल कडू (215), ढाके सरलाबाई राजेंद्र (233).

तळवेल - प्रभाग क्र.1 - कोळी रत्न किशोर (394), पाटील स्मिता रवींद्र (338), पाटील सुवर्ण अमोल (382). प्रभाग क्र.2 - कोळी किशोर काशिनाथ (470), चौधरी सरिता पंकज (403), पाटील मनीषा सुधीर (418). प्रभाग क्र.3 - भारसके उल्हास रामदास (200), पाटील छाया संतोष (222). प्रभाग क्र.4 - गुरचळ प्रमिला संजय (367), पाटील तुषार देविदास (496). प्रभाग क्र.5 - पाटील सोपान मुरलीधर (319), झोपे संतोष ज्ञानदेव (252), गुरचळ कांताबाई भीमराव (277 ईश्वर चिट्ठीने विजयी).

विजयी उमेदवारांचे आ.संजय सावकारे यांनी फोनवरून तर माजी आ.संतोष चौधरी यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. मतमोजणी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होवू नये म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे व शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक गजानन पडघन व त्यांच्या सहकार्‍यांनी बंदोबस्त राखला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com