भुसावळात ६३ धार्मिक स्थळांनी घेतली ध्वनिक्षेपकाची परवानगी

राज ठाकरेंच्या इशार्‍यानंतर सतर्कता
भुसावळात ६३ धार्मिक स्थळांनी घेतली ध्वनिक्षेपकाची परवानगी
USER

भुसावळ BHUSAWAL

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (RAJ THAKRE) यांनी धार्मिक स्थळांवरील भोंगे (LOUD SPEAKER) उतरविण्यासाठी ४ मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर बहुतांश धार्मिक स्थळांनी भोगे उतरविले आहे. मात्र कारवाईचा बडगा टाळण्यासाठी शहरातील ६३ धार्मिक स्थळांनी (police) पोलिस प्रशासनाकडून ध्वनीक्षेपक वापराची परवाणगी घेतल्याची माहिती पोलिस सुत्रांकडून देण्यात आली.

अल्टीमेटम दिल्यानंतर भोंगे न उतविण्या आल्यास ४ मे पासून मशिदीबाहेर हनुमान चालिसा (HANUMAN CHALISA) लावण्याचे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कुठेही अनुचित घटना घडू नये यासाठी बडा हनुमान मंदिर, राम मंदिर, मोठी मशीद व अन्यत्र बंदोबस्त वाढवण्यात आला आहे तर शहरातील १७ मंदिरे, ३८ मशिदी, २ मदरसे आणि ६ बुद्ध विहारांशी निगडीत प्रमुखांनी पोलिस ठाण्यातून नियमानुसार ध्वनीक्षेपकासाठी परवानगी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मनसेच्या नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे (DYSP SOMNATH WAGHCHOUREयांनी ३ रोजी रात्रीच शहरातील पोलिस निरीक्षकांची बैठक घेतली. त्यात कार्यक्षेत्रातील मंदिर, मशीद आणि अन्य धार्मिक स्थळांबाहेर पोलिस बंदोबस्त लावण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार बुधवारी सकाळपासून बंदोबस्त तैनात झाला. मनसेचे पदाधिकारी अथवा अन्य कोणत्याही व्यक्तीने मशिदीबाहेर भोंगे किंवा अन्य साहित्य आणल्यास त्यांना ताब्यात घेण्याच्या सूचना असल्याने पोलिस ऍक्शन मोडवर होते.

Related Stories

No stories found.