
जळगाव । प्रतिनिधी jalgaon
शालेय पोषण आहार (School nutrition diet) योजनेंतर्गत कोविडच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिजविलेल्या आहाराऐवजी कोरडे (Ration) रेशन (rice) तांदूळ व आहार खर्च मर्यादेत धान्यादी माल विद्यार्थ्यांना सध्यास्थितीत वितरीत करण्यात येत आहे. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत सध्या (School) शाळास्तरावर पुरवठा करण्यात येत असलेल्या तांदूळामध्ये काही प्रमाणात (Fortified rice) फोर्टीफाईड तांदळाची भर पडली आहे.
फोर्टीफाईड तांदूळ हा नियमित तांदळापेक्षा पिवळसर असल्याने विद्यार्थी-पालकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. यासंदर्भात पुणे प्राथमिक शिक्षण संचालक विभागाने (Department of Education) शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पुरवठा करण्यात येणारा फोर्टीफाईड तांदळ हा अधिक पोषक मूल्य असलेला गुणवत्तापूर्ण तांदूळ असल्याचा दावा केला आहे.
केंद्र शासनाकडून (Central government) शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून शालेय पोषण आहार योजनेंतर्गत फोर्टीफाईड तांदूळ प्रथमच पुरवठा केला जात आहे. पुरवठा करण्यात येणार्या तांदूळामध्ये फोर्टीफाईड तांदूळ व नियमित तांदूळ यांचे प्रमाण 1:100 असे आहे. म्हणजे एक किलोमध्ये 10र्ग्रम या प्रमाणात फोर्टीफाईड तांदूळ राहणार आहे.
विद्यार्थ्यांच्या (Student) आहारामध्ये सुक्ष पोषकत्वांची कमतरता भरुन काढण्यासाठी फोर्टीफाईड तांदूळ देण्यात येत आहे. या तांदूळामध्ये iron,Folic acid and Vatamin B 12, Or Zinc, Vitamin A, Vitamin B1, B2, B5, B6 या पोषक घटकांचा समावेश करुन फोर्टीफाईड तांदूळ बनविण्यात आलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक पोषकतत्वे मिळण्याच्या दृष्टीने फोर्टीफाईड तांदूळ अत्यंत उपयुक्त आहे.
प्रकिया असलेल्या फोर्टीफाईड तांदूळाचे वजन हे नियमित तांदूळापेक्षा कमी असते. त्यामुळे सदरचा तांदूळ पाण्यामध्ये वर तरंगतांना दिसून येतो. त्यामुळे शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पुरवठा करण्यात आलेल्या तांदळापैकी काही फोर्टीफाईड तांदूळ पिवळसर रंगाचा दिसत असेल आणि पाण्यामध्ये तांदूळ भिजू घातल्यानंतर त्यापैकी काही तांदूळ पाण्यावर तरंगत असल्याचे निदर्शनास आल्यास गैरसमज करण्यात येऊ नये, असे पुणे प्राथमिक शिक्षण संचालकांनी काढलेल्या पत्रात नमूद केले आहे.
फोर्टीफाईड तांदूळ हा भारतीय अन्न महामंडळाकडून अभिप्राय घेण्यात आला असून फोर्टीफाईड तांदूळ प्लास्टिकचा नसून फोर्टीफाईड तांदूळ असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच फोर्टीफाईड तांदूळ नियमित पद्धतीने शिजविण्यात यावा, याकरिता कोणत्याही प्रकारची वेगळी कार्यपद्धती अवलंबविण्याची आवश्यकता नाही. फोर्टीफाईड तांदूळाबाबत अधिकची माहिती जाणूनघ्यावयाची असल्यास केंद्र शासनाच्या फूड सेफ्टी अॅन्ड स्टॅनडर्ड अॅथोरिटी ऑफ इंडिया यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाला आदेश प्राप्त झाल्याचे. प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील (Education Officer Vikas Patil) यांनी सांगितले.