मुजोर के.के.पाटील ला त्वरित निलंबीत करा

राष्ट्रीय जनमंच पक्षाची निवेदनाव्दारे मागणी, संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन छेडण्याचा दिला इशारा
मुजोर के.के.पाटील ला त्वरित निलंबीत करा

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी -

चाळीसगाव शहरातील हनुमानसिंग राजपूत नगर परिसरातील संतोषी माता मंदिराजवळ कीर्तन (Kirtan) सुरु असताता, पोलीस निरीक्षक के.के.पाटील (Police Inspector KK Patil) यांनी त्याठिकाणी जाऊन सदर माईक बंद केला तसेच वारकरी संप्रदायात (Warkari sect) पवित्र मानल्या गेलेल्या नारदाच्या गादीवर (Narada's mattress) बुटासहित पाय ठेवले, तसेच तेथे उपस्थित किर्तनकार महाराजांसह वारकर्यांना दमबाजी (Arrogance) केली. यामुळे संपूर्ण वारंवारी संप्रदायाच अवमान झाला असून राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. आज घटनेचा राष्ट्रीय जनमंच पक्षातर्फे (Rashtriya Janmanch Paksha) निषेध करण्यात आला असून अशा मुजोर अधिकार्याचे त्वरित निलंबन (Suspension) करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. यासंबंधीचे निवदेनही राष्ट्रीय जन मंच (सेक्युलर )तर्फे आज दि,२९ रोजी उपविभागीय पोलीस आधिकारी यांना देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, हनुमानसिंग नगर परिसरात कीर्तनाचा कार्यक्रम सुरु असतांना शहर पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी बूट घालून स्टेज वर चढ़ले. त्यांनी पवित्र अशा नारदाच्या गादी वर पाय ठेवत, माईक हातात घेऊन कीर्तनकार महाराज पखवादकाला चिथावणीखोर पद्धतीने धमकावले. अश्या पद्धतीने नारदाच्या गादीचा अपमान केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय जनता संतप्त झाली आहे. जनतेच्या मनात अशा पोलीस अधिकारी विरोधात चीड निर्माण झाली आहे. असे कृत्य पोलीस अधिकार्याला न शोभणारे आहे. आम्ही याचा पक्ष्याच्या वतीने तीव्र निषेध करतो. तरी काल २८.४. २०२२ रोजी आमदार मंगेश चव्हाण यांच्या ऑफिस मध्ये माफी मागण्याचा जो केविलवाणा प्रयत्न केलेला आहे तो कुठल्याही पद्धतीने मान्य करण्यासारखा नाही. ह्या प्रकरणी जनतेच्या भावना अंत्यंत तीव्र आहेत. लग्न समारंभात रात्री ११-१२ वाजेपर्यंत डीजे सुरु असतात अशा वेळेस कुठे गेली यांची कर्तव्य दक्षता ? डीजे सुरु असताना अर्थीक हितासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचे हिंदू समाज प्रबोधन करणार्या कीर्तनकारांवर खाकी वर्दी घालून दहशत माजवण्याचा प्रयत्न करायचा हे कदापि खपवून घेतले जाणार नाही. स्वतःला हिंदूवादी समजणार्या पक्ष्याचे आमदार या प्रकारनात हिंदू धर्माचा अपमान करणार्या पोलीस निरीक्षकाला पाठिशी घालतात. हे अंत्यंत विरोधाभासी आहे. तरी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून ७ दिवसाच्या आत चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक के के पाटील यांना निलंबित करावे. अन्यथा राष्ट्रीय जन मंच (सेक्युलर ) पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन छेडण्यात येईल. निवेदन देतेवेळी राष्ट्रीय जन मंच पक्षाचे सचिव संदीप लाडके, शहराध्यक्ष निलेश गायकवाड, उपाध्यक्ष सचिन शेठे आदि उपस्थित होते.

'' कायदा सर्वांसाठी समान आहे. परंतू कायद्याची भाषा आशा मुजोर पद्धतीने वापरली जात असेल तर हे योग्य नाही. घडलेल्या प्रकरणाचा आम्ही निषेध करतो. तसेच मुजोर पोनि.के.के.पाटील यांचे त्वरित निलंबन करावे, नाहीतर आम्ही राज्यभर आदोलन करु ''.

संदिप लाडके, राष्ट्रीय जन मंच पक्ष

Related Stories

No stories found.