शिबिरात नागरिकांच्या समस्यांचे तात्काळ निवारण: समाधान महाजन

प्रभाग ८ मध्ये प्रा. धीरज पाटील यांच्या माध्यमातून ५६ कुटुंबांना शिधापत्रिका वाटप
शिबिरात नागरिकांच्या समस्यांचे तात्काळ निवारण: समाधान महाजन

भुसावळ (Bhusawal) (प्रतिनिधी)-

सर्वसामान्य नागरिकांच्या (citizens) विविध समस्यांचे निराकरण (Problem solving) करण्यासाठी शिवसेनेमार्फत (Shiv Sena) आयोजित केलेले शिबीर आशेचा किरण ठरला असून हा उपक्रम सुरु झाल्यापासून नागरिकांच्या समस्यांचे तात्काळ निवारण होत आहे, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन (District Head Samadhan Mahajan) यांनी केले.

शहरातील शिवसेनेचे तालुका संघटक प्रा. धीरज पाटील व प्रा. सीमा पाटील यांनी आयोजित केलेल्या रेशनकार्ड वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

या प्रसंगी विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, महिला आघाडीच्या तालुका संघटिका भुराबाई चव्हाण, रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललित मुथा, शहर प्रमुख निलेश महाजन, माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ, संदीप भोई, नमा शर्मा, विभागप्रमुख अमोल पाटील, भारती गोसावी, विक्की चव्हाण, योगेश कोळी, गिरीश राणे, राजेश पाटील, हर्षल पाटील, शशिकांत दुसाने, पंकज इंगळे उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक ८ मधील गणेश कॉलनी, भोई नगर, श्री नगर, मोहित नगर, भिरूड कॉलनी, जुनी हुडको कॉलनी, अयोध्या नगर, नारायण नगर भागातील ५६ कुटुंबांना शिधापत्रिका वाटप करण्यात आले. या शिबीरात केशरी शिधापत्रिका धारकांना (Orange ration card) १२ अंकी क्रमांक मिळवून देणे, नवीन शिधापत्रिका तयार करून देणे, जिर्ण शिधापत्रिका बदलुन देणे, नाव कमी करणे, नवीन नावाचा समावेश करणे आदी कामे करण्यात आली.
शिधापत्रिकासंबंधी तक्रारीसाठी संपर्क करावे:
अनेकदा नागरिकांना रेशनकार्ड (Ration card) मिळवण्यासाठी तहसील कार्यालयाच्या मदतीने शिबिराचे आयोजन केले होते. शिबिर घेतल्याने शिधापत्रकांबाबत अडचणींची तात्काळ सोडवणूक होत आहे. या शिबिरांतून ५६ लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वाटप केले आहे. नागरिकांनी शिधापत्रिकासंबंधी तक्रारीसाठी संपर्क करावे असे आवाहन प्रा. धिरज पाटील यांनी केले आहे.
प्रसंगी, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या एम. एसी. बायोकेमिस्ट्री अभ्यासक्रमाचे सुवर्णपदक प्राप्त करणार्‍या प्राची दिनेश खैरनार हिचा सत्कार करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com