भुसावळ येथील महामार्गावर बेकायदा बायोडिझलची विक्री

पोलिस व जिल्हा पुरवठा विभागाने लक्ष घालण्याची मागणी
भुसावळ येथील महामार्गावर बेकायदा बायोडिझलची विक्री
देशदूत न्यूज अपडेट

भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी

दीपनगर कपिलवस्ती (Deepnagar Kapilavasti) व भुसावळ ते वरणगाव (Bhusawal to Varangaon road) रस्त्या दरम्यान एका ढाब्यावर (dhaba) बायोडिझेलचा (biodiesel) काळाबाजार (Black market started)सुरू आहे. या ढाब्यावर गेल्यावर्षी (Last year at the dhaba) लाखो रुपयांचे (Millions of rupees) बायोडिझेल ब्लॅक (Biodiesel Black) मध्ये विकले (was sold) गेले होते व तेथे काही लोकांना रंगेहाथ पकडले होते. परंतु पुन्हा अजूनही हा धंदा असा सुरू झाल्याचे दिसत आहे.

स्थानिक भुसावळ येथील पोलिसांच्या आशीर्वादाने हा धंदा चालू आहे असे दबक्या आवाजात नागरिकांमधून बोलले जात आहे. मग उपविभागीय अधिकारी यांच्यावर कारवाई का करत नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. म्हणून या धंद्यावर जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कारवाई करतील का तसेच जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेने यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा.

शासनाने जे बायोडिझल बंद केले होते ते बायोडिझेल इथे सर्रासपणे विकले जात होते. तेव्हा देखील यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. आज देखील तोच धंदा या लोकांनी चालू केला असून यांच्यावर गुन्हा न दाखल करण्यामागे भुसावळ पोलीस व या विभागाचे अधिकारी, तहसीलदार व वरिष्ठ अधिकारी यांच्यावर आता तरी कारवाई करतील का?

या ट्रकमध्ये भरले जात असलेले डिझेलची तपासणी करून डिझेल ओरिजनल आहे किंवा डुप्लीकेट आहे की बायोडिझेल आहे अशा तपासणी करून पेट्रोल पंप मालक, दोषींवर व वाहन मालकांवर गुन्हे दाखल होणार का? यावर वरिष्ठ अधिकारी काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com