जिल्ह्यात अवैध दारु निर्मिती , विक्री केंद्रांवर छापेमारी

12 लाखांचा मुद्देमाल जप्त ; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
जिल्ह्यात अवैध दारु निर्मिती , विक्री केंद्रांवर छापेमारी

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) जिल्यातील भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, यावल व रावेर तालुक्यात अवैध हातभट्टी दारु (Illegal kiln liquor) निर्मिती व विक्री केंद्रांवर धाडी (raid) टाकून तब्बल 12 लाखांचा मुद्देमाल जप्त (Seizure of property)केला.तसेच वेगवेगळ्या ठिकाणी संबंधितांवर 42 गुन्हे (Crime) दाखल करण्यात आल्याची माहिती अधीक्षक (Superintendent) सिमा झावरे (Sima Jhaware) यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे (State Excise Department) विभागीय निरीक्षक (Inspector) सुजित कपाटे, दुय्यम निरीक्षक राजेश सोनार , सत्यविजय ठेंगडे , सागर देशमुख,मधुकर वाघ, विठ्ठल हाटकर, योगेश राठोड यांच्या पथकाने भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, यावल व रावेर तालुक्यात अवैध हातभट्टी दारु (Hatbhatti Daru) निर्मिती व विक्री केंद्रांवर छापेमारी (Raid) केली.

यात 34 हजार 200 -लिटर रसायन, 653 लिटर गावठी हातभट्टी दारु, 169 लिटर देशी मद्य, 72 लिटर विदेशी मद्य, 55 लिटर बियर,131 लिटर बनावट विदेशी मद्य, 1 ओमनी कार, 3 मोटरसायकली असा एकूण 12 लाख किमतींचा मुद्देमाल जप्त (Seizure of property) केला.तसेच संबंधितांविरुध्द मुंबई दारुबंदी कायद्यांतर्गत (Mumbai Prohibition Act) गुन्हे नोंद करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com