अवैध मुरूमाचा ‘रात्रीस खेळ चाले’

महसूल विभागाचा काना डोळा, की आशीर्वाद ?
अवैध मुरूमाचा ‘रात्रीस खेळ चाले’

खंडाळा (Khandala) , ता. भुसावळ (वार्ताहर)-

तालुक्यातील किन्ही (Knhi) औद्योगिक वसाहत (Midc) तसेच खंडाळा परिसर व कुर्‍हा शेतशिवारात कोणताही परवाना धारक खदान व उत्खनन (Mining and excavation) करण्याचा परवाना नसल्यावर ही रोजच रात्री ते सकाळपर्यंत अवैध रित्याने लाखो टन मुरूमाची चोरी (Theft of pimples) करण्यात येत आहे.

अवैध रीत्या रात्रभर मुरूमची चोरी (Theft of pimples) करणारे चोरटे एका लोकप्रतिनिधीचे खंदे समर्थक व कार्यकर्ते असून हे त्यामुळे या चोरी करण्यार्‍यांवर महसूल विभागाचे दुर्लक्ष आहे की आशीर्वाद? हेच मोठं कोड पडलं असून महसूल विभागाचा काना डोळा का आहे? का हे रात्रभर अवैध रित्याने मुरूम चोरी (Theft of pimples) करण्यावर कार्यवाही करीत नाही..? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हे मुरूम चोरी करणारे दिवसभर कुणाला किती व कुठे व कोणत्या गावात मुरूम पाहिजे याचे विचारपूस करून रात्री अकरा वाजेनंतर नागरिक झोपले की रात्रभर यांचा रात्रीस चोरीचा सर्रास पणे कार्यक्रम सुरू होतो.

रोजच रात्रभर या पोकलँड, जेसीबी, डपंर, ट्रॅक्टरच्या आवाजाने नागरिक त्रस्त (Citizens suffer) झाले असून तक्रार कुणाकडे करायची व संबंधित विभागाकडे तक्रार केली तरी त्याचे कोणी ऐकायला तयार नाही रोजच रात्रभर या परिसरात चढ्या भावाने हा मुरूम सर्रास पणे विकला जात असून महसूल विभागाचा (Revenue Department) लाखो रुपयांचा कर बुडत असून गेल्या अनेक महिन्या पासून हा हा प्रकार सुरू आहे. असे जर शेतकर्‍यांनी शेताचा शेतसारा उशिरा भरला तर त्याला लगेच महसूल विभाग (Revenue Department) कर भरायला भाग पाडतो मग हा मुरूम चोरी करणार्‍यांवर व लाखो रुपयेचे कर बुडवणार्‍या महसूल विभाग का मेहेरबान आहे? का यामध्ये यांचे पण काही चिरीमिरी तर नाही न..? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या अवैध रित्या मुरूमाची चोरी करणार्‍या वर महसूल विभागाने लक्ष द्यावे व दंडात्मक कार्यवाही (Punitive action) करून पंचनामा (Panchnama) करून लाखो रुपयांचा कर वसूल करावा अशी मागणी खडका, किन्ही, शिवपूर -कन्हाळा, साकरी, खंडाळा, मोंढाला, शिंदी, कुर्‍हा या परिसरातील नागरिक करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com