खान्देशी मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहणार्‍यांकडून कलावंतांकडे दुर्लक्ष

खान्देश स्तरीय वही गायन स्पर्धेप्रसंगी पालकमंत्र्यांची खडसेंवर बोचरी टीका
खान्देशी मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहणार्‍यांकडून कलावंतांकडे दुर्लक्ष

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

पालकमंत्री (Guardian Minister) म्हणुन माझ्या कार्यकाळात जी कामे (Works) मी करीत आहे, ती स्वातंत्र्याच्या इतिहासात कुणीही केली नाही. बरेच लोक वेगवेगळे बोलतात. खान्देशच्या मुख्यमंत्रीपदाची (Chief Minister's post) स्वप्ने उराशी बाळगणार्‍यांची खान्देशच्या कलावंतांकडे (artists) पाहण्याची हिम्मत देखील झाली नसल्याची टीका ना. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil ) यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) यांच्यावर केली.

जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) आणि शिवसेनेचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil ) यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप (Allegations) सुरू आहेत. शनिवारी नशिराबाद येथे एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्रीपदी डावलल्याने खान्देशवर अन्याय झाल्याचे विधान केले होते.

या विधानाचीच रि ओढत शिवसेनेचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी खडसेंवर जोरदार पलटवार केला. खान्देश (Khandesh) लोककलावंत विकास प्रतिष्ठानतर्फे (Folk Art Development Foundation) आयोजीत वहिगायन लोककला संमेलनात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. पुढे बोलतांना ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, खान्देशातील कलावंतांसाठी आजपर्यंत कुणीही काहीही केले नाही.

मात्र या कलावंतांना (artists) राजप्रतिष्ठा मिळवुन दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा शब्द दिला. तसेच विखुरलेल्या शक्तीला कुणीही मान देत नाही. संघटीत झालेल्याला लोक घाबरतात. त्यामुळे आमची कामे जो करणार नाही त्याचा डफ वाजविण्याची ताकद आमच्यात असल्याचेही ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com